Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जन्मदिवस आणि 'स्त्री'चा स्वभाव...

जन्मदिवस आणि 'स्त्री'चा स्वभाव...

वेबदुनिया

ज्योतिष्य शास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवसाचा स्वामी वेगळा ग्रह असतो. त्यामुळे जन्म दिवस, ग्रह स्वामी, आणि नक्षत्रांच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य बनते. जन्माच्या वारावरून त्या स्त्रीचा स्वभाव सांगता येऊ शकतो. चला तर पाहुयात...

सोमवार : ज्या स्त्रीचा जन्म सोमवारी झाला आहे, ती दिसायला खूप सुंदर, हुशार, मधुरभाषी, शांत स्वभावाची, नोकरी करणारी असते. या स्त्रीला सर्व प्रकारचे सुख मिळते.

पुढे पहा मंगळवारी जन्म घेणार्‍या स्त्रीचा स्वभाव


webdunia
WD


मंगळवार : ज्योतिष्य शास्त्रानुसार मंगळवारी जन्मलेली स्त्री कठोर ह्रदयाची, भांडखोर स्वभावाची, शक्तिशाली असते. या स्त्रिया सहजासहजी कोणावरही दया करत नाहीत.

पुढे पहा बुधवारी जन्म घेणार्‍या स्त्रीचा स्वभाव


webdunia
WD


बुधवारी :बुधवारी जन्म घेतलेल्या स्त्रियांवर स्वरस्वती देवीची कृपा प्राप्त झालेली असते. यामुळे शिक्षण क्षेत्रात यांना विशेष यश प्राप्त होते. या स्त्रिया दिसायला सुंदर, सदगुणी असतात. त्याचबरोबर या स्त्रिया सर्व कलांमध्ये कुशल असतात.

गुरुवारी जन्म घेणार्‍या स्त्रीचा स्वभाव


webdunia
WD


गुरुवार : ज्या स्त्रियांचा जन्म गुरुवारी झाला आहे, त्या उच्चशिक्षण घेतात. या स्त्रिया धैर्यवान, शांत स्वभावाच्या, श्रीमंत आणि सर्व सुखांची प्राप्ती करणाऱ्या असतात.

पुढील पानावर पहा शुक्रवारी जन्म घेणार्‍या स्त्रीचा स्वभाव


webdunia
WD


शुक्रवार : शुक्रवारी जन्म घेतलेल्या स्त्रीचा स्वभाव चंचल असतो. या स्त्रिया हुशार आणि सुंदर असतात. कुटुंब आणि बाहेरील जगामध्ये यांचे वेगळे स्थान असते. या स्त्रियांना मजा-मस्ती करायला खूप आवडते.

पुढील पानावर पहा शनिवारी जन्म घेणार्‍या स्त्रीचा स्वभाव


webdunia
WD


शनिवार : ज्या महिलांचा जन्म शनिवारी झाला आहेत त्या शरीराने सडपातळ व उंच असतात. कधी-कधी या स्त्रिया लावालावी करणार्‍या असू शकतात.

सर्वात शेवटी अर्थात रविवारी जन्म घेणार्‍या स्त्रीचा स्वभाव


webdunia
WD



रविवार : रविवारी जन्माला येणाऱ्या स्त्रिया चंचल स्वभावाच्या असतात. एखादी गोष्ट आत्ता आवडली असेल तर थोड्याच वेळात ती नावडतीही होऊ शकते.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुमचे ऑफिस आणि घर शुभ आहे तुमच्यासाठी!