Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमच्या पत्रिकेत शनि दोष आहे काय?

तुमच्या पत्रिकेत शनि दोष आहे काय?

वेबदुनिया

शनि ग्रह एका घरातून दुसर्‍या घरात जातो तेव्हा लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण होत असते. शनिची आपल्यावर वक्र
दृष्‍टी असल्यास काही तरी विपरीत घडते. बसलेली घडी विस्कटते, अशी समजूत आहे. शनिची प्रतिकूल अवस्था आपल्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. ते जाणून घेण्यासाठी खालील कसोट्या पाहा.

-आपल्याला नेहमी थकवा येत असेल तर...

-अंघोळ करण्याची इच्छा होत नसेल तर..

-नवीन कपडे खरेदी केले आहेत परंतु ते परिधान करण्यासाठी संधी मिळत नसेल तर...

-घरात तेल, दाळींचे नेहमी नुकसान होत असेल तर...

-अन्नावरील वासना उडाली असेल तर...

-डोक्यापासून कमरेपर्यंत प्रचंड वेदना होत असतील तर...

-वडिल आणि मोठ्या भावासोबत वारंवार खटके उडत असतील तर...

-अभ्यासात मन लागत नसेल तर...

आपल्याला वरील लक्षणे जाणवत असल्यास आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे, असे समजावे.

शनि दोष दूर करण्यासाठी उपाय:

-तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.

-पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावावा.

-हनुमान व सूर्याची आराधना करावी.

-मांस- मद्य यांचे सेवन करू नये.

-दीन दुबळ्यांना मदत करावी.

-काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

Share this Story:

Follow Webdunia marathi