Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्हाला हवे आहे मोठे घर आणि पैसा... मग हे करा!

तुम्हाला हवे आहे मोठे घर आणि पैसा... मग हे करा!

वेबदुनिया

वृषभ लग्न कुंडलीत बुध प्रथम आणि द्वितीय स्थानात असेल तर काय प्रभाव पडतो हे आपण पहिले. आता जाणून घ्या बुध तृतीय आणि चतुर्थ स्थानात असेल तर काय प्रभाव पडतो.

वृषभ लग्न कुंडलीत बुध तृतीय स्थानात असेत तर.....
एखाद्या व्यक्तीची वृषभ लग्न कुंडली असेल, आणि तृतीय स्थानात बुध ग्रह असेल तर त्या व्यक्तीला भाऊ-बहिणेचे सुख प्राप्त होते. या कुंडलीतील तिस-या स्थानाचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे हे लोक पराक्रमी असतात. आशा ग्रह स्थितीमुळे हे लोक उद्यमी, परिश्रमी, पराक्रमी, धनवान असतात. हे लोक धर्म क्षेत्रात जास्त कार्य करतात.

वृषभ लग्न कुंडलीत बुध चतुर्थ स्थानात असेत तर.....
एखाद्या व्यक्तीची वृषभ लग्न कुंडली असेल, आणि तृतीय स्थानात बुध ग्रह असेल तर त्या व्यक्तीला भूमी, घर, पैसा या सर्व गोष्टी प्राप्त होतात. चतुर्थ स्थान सिंह राशीचे आहे या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. सूर्य राशीत बुध असल्यामुळे हे लोक बुद्धिमान असतात.

शिक्षण क्षेत्रात या लोकांना प्रसिद्धी प्राप्त होते. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या लोकांना घर, कुटुंबापासून सुख प्राप्त होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi