Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशीप्रमाणे जाणून घ्या, काय आहे तुमची सर्वात मोठी वीकनेस

राशीप्रमाणे जाणून घ्या, काय आहे तुमची सर्वात मोठी वीकनेस
, शुक्रवार, 6 मे 2016 (16:06 IST)
मेष राशी
मेष राशीचे लोक चूक तर चूक आणि खरं तर खरं हे सांगायला बिलकुल संकोच करत नाही. त्यांना ह्या गोष्टीने काही फरक पडत नाही की लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील. ते कुठल्याही स्थितीत अन्याय सहन करू शकत नाही. पण बर्‍याचदा त्यांना केल्याचा व्यवहाराचा पश्चात्ताप देखील होतो पण म्हणतो ना की ‘अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत’. या राशीचे लोक जास्त करून आपल्याबद्दलच विचार करत असतात.

वृषभ राशी  
webdunia
वृषभ राशीचे लोक जिद्दी आणि कडक स्वभावाचे असतात. मग ती महिला असो किंवा पुरुष, जर ते वृषभ राशीचे असतील तर ते आपले विचार आणि मान्यतांबद्दल फारच जिद्दी असतात. त्यांना आपले कम्फर्ट आणि सन्मानाच्या पुढे दुसरे काही दिसत नाही.  
 
जिद्दी 
तुम्ही एका वृषभ व्यक्तीच्या पुढे कितीही हात पाय जोडा पण जी गोष्ट त्यांना पसंत नाही किंवा जेथे जाणे त्यांना पसंत नसते तुम्ही कधीही त्यांना तेथे घेऊन जाऊ शकत नाही.

मिथुन राशी 
webdunia
या राशीच्या लोकांना वेळेची किंमत नसते, हे कधीच वेळ पाळत नाही. यांना बदल पसंत असतो, कदाचित हे लोक मानसिकरूपेण थोडे कंफ्यूज राहतात. तेव्हाच एक जॉब, एक स्थान येवढंच नव्हेतर एका जोडीदारासोबत देखील हे जास्त दिवस राहू शकत नाही. या लोकांमध्ये इमॅजिनेशन पॉवर फार जास्त असते.

कर्क राशी 
webdunia
कर्क राशीचे लोक फार जास्त संवेदनशील असतात, जेवढी जास्त संवेदना तेवढीच जास्त निराशा. या राशीचे लोक आतून फारच निराशावान असतात. जगासमोर यांचा एक वेगळाच चेहरा असतो पण वास्तविक बघितले तर हे लोक निराशावादी असतात. यांच्यात सदैव एक भिती असते.  

मुडी
कर्क राशीचे लोक फार जास्त मुंडी असतात, जर तुमच्याशी बिगर कुठल्याही वाद असताना उगीचच भांडायला लागले तर समजूनघ्या तो व्यक्ती कर्क राशीशिवाय दुसरा कोणी हूच शकत नाही. मुख्य म्हणजे हे लोक तुमच्याशी नव्हेतर आपल्या जीवनापासूनच नाराज असतात.

सिंह राशी 
webdunia
पैसा कसा बरबाद करायचा हे फक्त सिंह राशीचे लोकांनाच माहीत असते. यांचे खर्च असीमित असतात आणि यांना काहीही फरक पडत नाही की त्यांच्याजवळ कोणतेही सेविग्स नाही आहे.  
 
वैवाहिक जीवन  
जर तुम्ही अशा व्यक्तीशी विवाह करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला ही गोष्ट आपल्या डोक्यात बसवून घ्यावी लागेल की सिंह राशीच्या लोकांसाठी संबंधांमध्ये ‘स्पेस’नावाचा शब्द नसतो.   

कन्या राशी 
webdunia
कन्या राशीचे व्यक्तीला कधीही आपल्यात काय कमतरता आहे हे दिसत नाही आणि हीच त्यांची सर्वात मोठी वीकनेस आहे. त्यांना आपली निंदा ऐकणे बिलकुल आवडत नाही, जर त्यांना कोणी काही बोलले तर त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. कन्या राशीचे लोक चूप राहणे पसंत करतात, यांच्या मनाची गोष्ट तुम्ही जाणून घेऊ शकत नाही.

तुला राशी 
webdunia
तुला राशीचे लोक फारच आळशी असतात. बर्‍याच दिवसांपर्यंत हे लोक फक्त प्लान बनवत राहतात आणि शेवटी आपल्या आळशीपणामुळे त्या प्लानला पूर्ण करू शकत नाही. हे लोक योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यास मागे राहून जातात.

वृश्चिक राशी 
webdunia
वृश्चिक राशीचे लोक न तर लवकर कोणाला विसरतात आणि नाही कोणाला माफ करतात. जर यांच्याबरोबर कोणी वाईट करते तर त्याच्याशी बदला घेण्यासाठी ते कोणतीही मर्यादा तोडू शकतात. महत्त्वाचे म्हणजे खरं कितीही कडू किंवा वाईट असले तरी वृश्चिक राशीचे लोक खरं ऐकणे आणि खरं म्हणणे पसंत करतात. 

धनू राशी  
webdunia
धनू राशीचे व्यक्ती आपल्या कुटुंबीयांप्रती समर्पित नसतात, त्याला आपल्या जवळच्या लोकांशी काहीही घेणे देणे नसते. ह्या राशीचे लोकं पक्के जुगार खेळणारे असतात. जुगार खेळण्याची जागा आणि पद्धत धनूराशीच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करते. ते हा विचार करत नाही की यामुळे त्यांचे किती नुकसान होणार आहे, त्यांना जुगार खेळायचा असेल तर ते नक्कीच खेळतील. हीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. 

मकर राशी 
webdunia
मकर राशीचे लोक फक्त बाहेरून दाखवतात की जग त्यांच्याबद्दल काय विचार करतो, पण त्यांना ह्या गोष्टीचा कधीच फरक पडत नाही. आतल्याआत हे लोक आपली तारीफ ऐकण्यासाठी तडफडत राहतात. यांना स्वत:ची तारीफ ऐकणे फारच पसंत असते आणि निंदा करणारे लोक त्यांना अजिबात आवडत नाही.   

कुंभ राशी 
webdunia
जर तुम्ही एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडले असाल तर जरा सांभाळून पुढे जा कारण कुंभ राशीचा जातक कधीही एका व्यक्तीप्रती समर्पित राहत नाही. एका वेळानंतर त्यांना दुसर्‍या नवीन जोडीदाराचा शोध असतो. इच्छा असूनही ही हे लोक एका निर्धारित वेळेनंतर आपल्या जोडीदारासोबत राहू शकत नाही.  

मीन राशी 
webdunia
मीन राशीच्या जातकांना समस्यांचे समाधान काढण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर पळायला जास्त आवडत. हे कुठल्याही गोष्टीला फारच सकारात्मकतेने घेतात, ह्या लोकांना जगाला आपल्या डोळ्याने बघायला आवडत. यांना ज्या गोष्टी खोट असल्या पण जर त्यांना त्या आवडत असल्या तर मग त्याचे खरं स्वरूप काय आहे, हे जाणून घ्यायची यांना गरज नसते.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुकानात चोरी किंवा सारखी आग लागत असेल तर हा उपाय करा