suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

हिंदू धर्मात जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे रहस्य सांगितले आहे. गरुड पुराणानुसार, मृत्यू अचानक येत नाही, तर काळ जवळ आल्यावर शरीरात आणि निसर्गात काही विशिष्ट संकेत दिसू लागतात, जे व्यक्तीला अंतकाळाची जाणीव करून देतात.
 
मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत खालीलप्रमाणे आहेत:
१. सावली दिसेनाशी होणे: गरुड पुराणात सांगितल्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ अत्यंत जवळ येतो, तेव्हा त्याला पाण्यात, तेलात किंवा आरशात स्वतःचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसू लागते किंवा पूर्णपणे नाहीसे होते.
 
२. चंद्र, सूर्य, अग्नी प्रकाश पाहण्यास असमर्थता: मृत्यूपूर्वी व्यक्तीची दृष्टी कमकुवत होते. अशा वेळी दोन्ही डोळ्यांनी स्वतःच्या नाकाचे टोक किंवा दोन्ही कान बोटांनी बंद केल्यावर ऐकू येणारा अंतर्गत आवाज येणे बंद होते. चंद्र, सूर्य, अग्नी प्रकाश पाहण्यास असमर्थता जाणवते.
 
३. स्वप्नात पूर्वज दिसणे: मृत्यूच्या काही दिवस आधी व्यक्तीला वारंवार आपल्या मृत नातेवाईक किंवा पूर्वजांचे स्वप्न पडते. त्यांना पूर्वज आपल्या जवळ आल्याचे किंवा बोलावल्याचा भास होतो.
 
४. यमदूत किंवा नकारात्मक ऊर्जेचा भास: अंतिम समय जवळ आल्यावर व्यक्तीला रात्रीच्या वेळी विशेषतः अनोख्या भीतीचा सामना करावा लागतो. आजूबाजूला काही नकारात्मक किंवा अदृश्य शक्ती असल्याची जाणीव होते.
 
५. हाताच्या रेषा पुसट होणे: आयुष्याच्या अगदी अंतिम टप्प्यात असताना हाताच्या तळव्यावरील रेषा फिकट होऊ लागतात आणि काही वेळा पूर्णपणे गायब झाल्यासारख्या दिसतात.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 20.05.2026