Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशुभ सूर्य नोकरीस घातक

अशुभ सूर्य नोकरीस घातक

वेबदुनिया

जन्मपत्रिकेत असलेला 10 वा भाव सगळ्यात महत्त्वाचा असतो. यावरच आपले कर्म क्षेत्र, वडील, व्यापार, उच्च नोकरी, राजकारण, उच्चपद या गोष्टी अवलंबून असतात. जन्मपत्रिकेतील 10 भाव अशुभ असेल तर आयुष्य सरतं परंतु आपल्या जीवनाची गाडी रुळावर येत नाही.  
 
सूर्य अशुभ असेल तर आपल्याला वडिलधार्‍यांचा आधार मिळत नाही. राजकारणात नेहम‍ी अपयश मिळते. व्यापार अथवा नोकरीत कधी न सुटणार्‍या अडचणी निर्माण होतात. कुंडलीत जर सूर्य व शनि सोबत असतील तर त्या घरात वडील व मुलगा यांच्यात नेहमी खटके उडत असतात. सूर्यासोबत राहू आल्यास पितृदोष असून तो प्रत्येक शुभकार्यात अडचणी निर्माण करणारा असतो.
 
सूर्य- चंद्राची स्थिती अमावस्या योग असल्याने जातकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शनीची सूर्यावर वक्रदृष्टी असते. श्रेष्ठ सूर्य प्रत्येक क्षेत्रात फळ देणारा असतो. 
 
सूर्यासोबत जर गुरू आला असेल तर तो फायदेशीर ठरतो. राजकारणी लोकांना त्याचा भरपूर फायदा होत असतो. नोकरीतही इच्छेनुसार पद मिळत असते. नेहमी वडीलधार्‍या मंडळींचे पाठबळ मिळत असते. सूर्य- मंगळ असलेल्यांना पोलिस प्रशासनात नोकरीचे योग असतात. सूर्य जर बुध सोबत आला असेल तर त्याचे फळ नेहमीच चांगले मिळते. असा जातक विद्वान, उच्च प्रशासकीय अधिकारीही असू शकतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 28.07.2018