Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Astrology Kajal Remedy अनेक दोष दूर करण्यासाठी काजळाचे सोपे उपाय

Astrology Kajal Remedy
, शनिवार, 23 एप्रिल 2022 (11:53 IST)
काजळचा वापर स्त्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी आणि डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी करतात. हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये काजळच्या अनेक उपायांबद्दल सांगितले गेले आहे, जे सोपे आणि चमत्कारिक देखील आहेत.
 
प्रत्येक धर्मात काजळला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विशेष मानले जाते. हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले तर काजळचा थेट संबंध डोळ्यातील दोष दूर करण्याशी आहे. आपण शतकानुशतके पाहत आलो आहोत की वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना काजळ लावतात. पण काजळच्या वापराने इतर अडथळे दूर करता येतात.
 
क्लेश दूर करण्यासाठी
जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमधील संबंध चांगले नसतील तर तुम्ही ही युक्ती वापरून आपल्या नात्यात गोडवा निर्माण करु शकता. एका काळ्या कपड्यात वाळलेला नारळ गुंडाळून त्यावर काजळाने 21 ठिपके बनवून शनिवारी घराच्या मुख्य दरवाजावर टांगावे. असे केल्याने घरामध्ये ज्या नकारात्मक ऊर्जांमुळे त्रास होतो, तो नाहीसा होतो.
 
आनंद आणि समृद्धीसाठी
तुम्हाला तुमच्या जीवनात सुख-समृद्धी हवी असेल, तर रविपुष्य योगाच्या दिवशी तुम्ही काजळचा उपाय करा. 'पुष्यला नक्षत्रांचा राजा म्हणतात. सहसा हे नक्षत्र गुरुवार किंवा रविवारीच येते. या दिवसापासून तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता. तसेच या दिवशी गूलरच्या फुलाने त्यार काळज डोळ्यात लावून रात्री झोपल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
 
नजरदोष दूर करण्यासाठी
मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी डोळ्यात काजळ लावण्याऐवजी हाताच्या तळव्यावर, पायाच्या तळव्यावर, कानांच्या मागे आणि कपाळावर काजळचा ठिपका लावावा. हे आरोग्याच्या दृष्टीनेही सुरक्षित आहे आणि बालकांना दृष्टी कमी होण्यापासून वाचवण्यासाठीही हा उपाय अतिशय प्रभावी आहे.
 
शनिदोष दूर करण्याचा उपाय
तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल किंवा तुम्हाला शनीची महादशा येत असेल, तर तुम्ही शनिवारी आरशासमोर उभे राहून डोक्यावर 9 वेळा काजळ सरळ आणि उलट क्रमाने फिरवून अशा ठिकाणी गाडले पाहिजे जिथे तुम्ही परत कधीही जाणार नाही. 
 
याशिवाय जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर शनिदेवाच्या मंदिरात सुरमा अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.
 
राहूला शांत करण्याचा उपाय
राहू ग्रहाला शांत करण्यासाठी अधिकाधिक काळी काजळ किंवा सुरमा दान करा. आधी घरी सुरमा बनवून मग दान केले तर बरे होईल. ज्या लोकांची नोकरी धोक्यात आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप चांगला असेल.
 
मंगळ दोष दूर करण्याचे उपाय
कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर असेल किंवा मंगल दोष असेल तर डोळ्यांना काळ्या ऐवजी पांढरा सुरमा लावावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 23.04.2022