चालण्यावरून ओळखून घ्या मुलींच्या काही खास गोष्टी

मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (13:31 IST)
बृहत्संहितानुसार मुलींच्या चालीवरून त्यांचा व्यवहार आणि सवयींबद्दल आपण अंदाजा लावू शकतो. तर त्यंच्या चालीवरून त्यांच्याबद्दतल जाणून घेऊ.
  
फास्ट चालणार्‍या मुली –
ज्योतिष्यानुसार अशा मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त पडतो. बर्‍याच मुली अशा असतात ज्या फार फास्ट चालतात. अशा मुलींना प्रत्येक ठिकाणी जायची घाई असते पण असे ही म्हणू शकतो की फास्ट चालणार्‍या मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त असल्यामुळे त्यांच्यात जास्त एनर्जी असते. ह्या मुलींमध्ये आत्माविश्वास फार असतो आणि ह्या निडर असतात. ह्या मुली जीवनात कुठल्याही अडचणींचा सामना योग्य प्रकारे करू शकतात. 
 
लहान लहान पावल टाकणार्‍या मुली –
या मुलींवर बुधचा प्रभाव जास्त असतो. म्हणून या मुली आरामात आणि लहान लहान पावलाने चालतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अशा मुली शांत प्रवृतीच्या असतात. त्या स्वत:च्या लाईफला आपल्या प्रकारे जणण्यात विश्वास ठेवतात. ह्या मुली हंसमुख आणि मिलनसार असून चांगल्या बोलणार्‍या व बुद्धिमान देखील असतात. ज्यामुळे यांची मैत्री लगेचच दुसर्‍या लोकांशी होते.
हळू चालणार्‍या मुली –
काही मुलींना फारच हळू हळू चालण्याची सवय असते. ज्योतिष्यानुसार अशा मुलींवर शनीचा प्रभाव जास्त असतो. अशा प्रकारच्या मुली सहज आणि शांत स्वभावाच्या असतात. ह्या नेहमी सावध राहण्याच्या प्रयत्नात असतात आणि प्रत्येक काम विचार करून करतात.
 
पाय रगडून चालणे –
ज्योतिष्यानुसार या प्रकारच्या मुलींवर राहु आणि शनिचा प्रभाव जास्त असतो. या दोन्ही ग्रहांच्या प्रभावामुळे ज्या मुली जमिनीवर पाय रगडून चालतात त्या त्यांच्या जीवनात फार दुखी असतात. अशा मुली फार कन्फ्यूज असतात. या मुली प्रत्येक गोष्टींवर फार विचार करतात तरी देखील निर्णय घेताना त्यांना फार त्रास होतो.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख संवेदनशील, भावुक मूलांक 2