Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सप्टेंबरमध्ये या दोन दिवसांत जन्मलेली मुले राजा असतील

webdunia
शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (13:47 IST)
9 सप्टेंबर रोजी सकाळी 5.30 ते 11 सप्टेंबरच्या सकाळी 2: 26 पर्यंत जन्मलेली मुले विशेष क्षमतांनी जन्माला आली आहेत. अशी मुले हुशार व श्रीमंत होतील आणि समाज व राष्ट्राला नवी दिशा दर्शवतील. हे यासाठी होणार आहे कारण हे दोन्ही दिवसात सर्व ग्रह आपापल्या उच्च राशीमध्ये स्वराशी आणि मित्र राशीमध्ये होते. चंद्र वृषभ राशीत उच्च होता. कन्या राशीत बुध, राहू मिथुन राशीमध्ये उच्च आणि केतू धनू राशीत उच्च होता. यासह, सूर्य सिंह राशीत आपल्या स्वराशीत, शनी  मकर राशीमध्येच स्वत:च्या राशीमध्ये, मेष राशीत मंगळ व शुक्र कर्क राशीत मित्र राशीत होते.  .
 
उच्च, स्वराशी आणि मित्र राशीत ग्रह असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. जर सूर्य, मंगळ, शनी स्वराशीत असतील तर ते एखाद्याला प्रबळ, धैर्यवान, सामर्थ्यवान आणि इतरांवर राज्य करणारा बनवतो. बुध, चंद्र आणि गुरु उच्च राशीमध्ये असल्याने ती व्यक्ती अभ्यासात हुशार असून उच्च शिक्षणामध्ये कुशल गुणधर्म असणारा असतो. राहू, केतू उच्च असले तर ती व्यक्ती दूरदर्शी, संघर्षशील, राजकारणी आणि कुशल प्रशासक असतो. जर शुक्र मित्र राशी किंवा स्वराशीत असेल तर संपत्ती, वैभव, आनंद, विलासी जीवन आणि आनंदाची प्राप्ती होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यावेळी कोणतेही ग्रह अस्त नव्हते. आकाशात सर्व ग्रह दिसत होते. म्हणूनच, ते संपूर्ण सामर्थ्याने देशाचे कल्याण करणारे असतील. असा योग बर्‍याच वर्षांतून एकदाच येतो. अशा परिस्थितीत, वरील दोन दिवसांत जन्मलेली मुले देशात नावे कमावतील आणि इतरांसाठीही चांगली असतील.
 
(ही माहिती धार्मिक विश्वास आणि लौकिक विश्वासांवर आधारित आहे, जी केवळ सर्वसाधारण लोकांचे हित लक्षात घेऊन सादर केली गेली आहे.) 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

घरात तुळशीचे रोपटं असल्यास या गोष्टी लक्षात असू द्या