13 एप्रिल 2020 रोजी सूर्याचे मीन राशी मधून उच्च राशी मेष मध्ये प्रवेश झाला आहे. या राशीमध्ये सूर्य अत्यंत प्रभावी असतो. मेष मध्ये रवीच्या आगमनानंतर प्रचंड उन्हाळा वाढणार आहे. सूर्य 14 मे पर्यंत मेष राशीतच राहणार आहे. मेष राशीचा सूर्य 12 राशींवर कसा प्रभाव पाडेल ते जाणून घेऊ या.
मेष - आत्मविश्वास वाढेल. संयमाने कार्य करावे. फायदाच्या संधी येतील.
वृषभ - नोकरदारांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकणार नाही. मित्रांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.
मिथुन - आपल्या कुटुंबात आणि समाजात सन्मान मिळेल. धनागमनाचे योग येतील. नोकरीत यश प्राप्ती मिळू शकते.
कर्क - धन लाभाचे योग आहे. वेळ आपल्याच बाजूला असणार, नवीन काम मिळेल. कुठलेही काम करण्याआधी विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका.
सिंह - जुनाट समस्यांपासून मुक्ती मिळेल. सन्मानाचे योग येतील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
कन्या- आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपर्युक्त ठरतील. धीर धरा. अती उत्साही होऊ नका.
तूळ - परिस्थिती आपल्या पक्षाची होऊ शकते. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. नोकरीत बढतीचे योग येतील. धनलाभ होऊ शकतो.
वृश्चिक - जेवढे कष्ट कराल तेवढेच फळ प्राप्ती मिळेल. सूर्य सामान्य परिणाम देईल. राग टाळा.
धनू - परिस्थिती चांगली होईल सर्वांचे सहकार्य मिळेल. कुठलेही कार्य सूर्याच्या साहाय्याने पूर्ण करता येईल.
मकर - अडथळ्यांना सामोरी जावे लागणार. निराशा वाढू शकते. तणाव टाळल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
कुंभ - विचार केलेले कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीत सहकाऱ्यांचे सहयोग मिळतील. मन प्रसन्न होईल.
मीन - आपल्याला सूर्यापासून सामान्य फळे मिळतील. यश प्राप्तीमध्ये वेळ लागू शकतो. मेहनत जास्त करावी लागेल. मानसिक ताण होऊ शकतो.