Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या चांगल्या 9 सवयी, देतील सुख आणि सन्मान

या चांगल्या 9 सवयी, देतील सुख आणि सन्मान
कुठेही न थुंकणे
जर आपल्याला कुठेही थुंकण्याची सवय असेल तर मुश्किलने आपल्याला यश, सन्मान मिळाला तरी तो टिकणार नाही. म्हणून थुंकायचे असेल तर वॉश बेसिन वापरा.
 
खरकटी भांडी न ठेवणे
ज्या लोकांना आपले खरकटे ताट तिथेच सोडण्याची सवय असते त्यांनी कधीच स्थायी यश मिळत नसतं. कितीही मेहनत केली तरी असे लोकं श्रीमंत होऊ शकत नाही. जर आपण खरकटे भांडी योग्य जागेवर ठेवाल तर चंद्र आणि शनी आपला सन्मान करतील. याने मानसिक शांती मिळेल आणि अडथळे दूर होतील. 
 
पाणी पाजणे
आपल्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्ती स्वच्छ पाणी पाजले पाहिजे. असे केल्याने आम्ही राहूचा सन्मान करतो. जे लोकं बाहेरहून येणार्‍या पाणी पाजतात त्याच्या घरात राहूचा दुष्प्रभाव पडत नाही. अशाने अचानक उद्भवणारे कष्ट आणि संकटापासून मुक्ती मिळते.
 

झाडांना पाणी देणे
झाडं घरातील सदस्याप्रमाणे असतात म्हणून त्यांना प्रेम आणि काळजीची गरज असते. ज्या घरांमध्ये सकाळ- संध्याकाळ झाडांना पाणी दिले जाते त्यांना घरातील लोकांना बुध, सूर्य आणि चंद्राचा सन्मान केल्यामुळे समस्यांना समोरा जायचं सामर्थ्य प्राप्त होतं. 
 
पादत्राणे जागेवर ठेवणे
जे लोकं बाहेरहून आल्यावर आपल्या चपला-जोडे आणि मोजे इकडे-तिकडे फेकून देतात, त्यांना ‍त्यांचे शत्रु परेशान करतात. यापासून बचावसाठी आपले पादत्राणे योग्य जागेवर व्यवस्थित ठेवले पाहिजे. प्रतिष्ठा मिळेल.
 
बिछाना आवरणे
त्या लोकांचा राहू आणि शनी वाईट परिणाम देईल जे बिछाना सोडल्यावर त्याला व्यवस्थित करत नाही. जे बिछान आवरत नाही अशा लोकांची ‍दैनिक जीवनही व्यवस्थित राहत नाही. अशामुळे ते परेशान राहतात आणि इतरांनाही परेशान करतात. म्हणून उठल्याबरोबर आपला बिछाना आवरायला हवा.

पायांची स्वच्छता
आम्हाला आपल्या पायांच्या स्वच्छतेवर लक्ष द्यायला पाहिजे. अंघोळ करताना पाय स्वच्छ धुवावे. बाहेरहून आल्यावर पाच मिनिट थांबून तोंड आणि पाय धुवावे. आपला चिड-चिड आपोआप कमी होईल. मा‍नसिक शक्ती वाढेल. आनंद मिळेल.
 
 
रिकाम्या हाती येऊ नये
रोज रिकाम्या हाती घर आल्याने घरातून लक्ष्मी रूसून जाते आणि कुटुंबातील लोकांमध्ये नकारात्मक आणि निराशाचे भाव येतात. या विपरित घरी येताना काही वस्तू घेत आल्याने घरात बरकत राहते. दररोज काही न काही आणण्याने वृद्धी होते.
 
पानात अन्न सोडू नये
पानात अन्न किंवा खरकटं सोडू नये. अशाने पैश्याची कमी होते. नऊ ग्रह वाईट परिणाम देऊ शकता. पैसा पाण्यासारखा वाहून जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुख-समृद्धीसाठी 11 सोपे उपाय