Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 21 April 2025
webdunia

ग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय!

मराठीत ग्रहांपासून होणरे आजार

वेबदुनिया

मनुष्याचे मन, मेंदू आणि शरीरावर मोसम, ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव पडत राहतो. काहींचा त्यापासून बचाव होतो तर काही
त्यात अडकून पडतात. कोणच्या ग्रहांमुळे कोणते रोग होण्याची शक्यता असते ते बघूया.

जन्म पत्रिकेत 6व्या आणि 8 व्या घराचे विश्लेषण करून रोगाची स्थिती आणि त्याचे उपाय करण्यात येतात. प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत ही स्थिती वेग वेगळी असते. येथे आम्ही सामान्य माहिती देत आहे, ज्याचे कुठल्याही पत्रिकेशी काहीही संबंध नाही आहे.

ग्रहांपासून होणारे आजार :
1. गुरू : वायू विकार (गॅस) आणि फुफ्फुसाचे आजार.
2. सूर्य : तोंडातून फेस निघणे, हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे, शारीरिक थकवा आणि रक्तदाब.
3. चंद्र : हृदय आणि डोळ्यांशी निगडित आजार.
4. शुक्र : त्वचा, खाज सारखे आजार.
5. मंगळ : रक्त आणि पोटाशी संबंधित आजार, यकृत, आमाशयाशी संबंधित आजार.
6. बुध : देवीचे वण, कमजोरी, जीभ आणि दातांचे रोग.
7. शनी : नेत्र रोग आणि खोकला होणे.
8. राहू : ताप, मेंदूशी संबंधित आजार, अचानक अपघात इत्यादी.
9. केतू : पाठीच्या कण्यासंबंधी आजार, मधुमेह, कान, स्वप्न दोष, हार्निया इत्यादी रोग.

रोगांचे उपचार :
1. गुरू : रोज केशराचे कुंकू लावावे टिका रोज लावावा आणि काही मात्रेत केशराचे सेवन करावे.
2. सूर्य : वाहत्या पाण्यात गूळ सोडावा.
3. चंद्र : एखाद्या मंदिरात काही दिवस कच्चे दूध आणि तांदूळ ठेवावे किंवा खीर-बर्फीचे दान करावे.
4. शुक्र : गायीची सेवा करावी आणि घर व शरीर स्वच्छ ठेवावे.
5. मंगळ : वटवृक्षाला 43 दिवस गोड कच्चे दूध द्यावे. त्या दुधाने ओल्या मातीचे टिळक लावावे.
6. बुध : 96 तासासाठी नाकात चांदीचा तार किंवा पांढरा दोरा घालून ठेवावा. तांब्याचे नाण्यात छिद्र पाडून वाहत्या पाण्यात सोडावे.
7. शनी : वाहत्या पाण्यात रोज नारळ सोडावे.
8. राहू : जवस, सरसों किंवा मुळा दान करावा.
9. केतू : मातीच्या तयार केलेल्या तंदूरमध्ये गोड पोळी बनवून 43 दिवस कुत्र्यांना घालावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 26.10.2018