Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

9 नोव्हेंबरचा दिवस आहे खास, या राशींच्या लोकांचे सर्व काम होतील सोपे

9 नोव्हेंबरचा दिवस आहे खास, या राशींच्या लोकांचे सर्व काम होतील सोपे
ज्योतिष विज्ञानानुसार 9 नोव्हेंबरचा दिवस फारच खास राहणार आहे कारण या दिवशी वर्षाचा सर्वात शुभ संयोग बनणार आहे. गुरुवारच्या दिवशी दुपारी 1 वाजून 39 मिनिटावर वर्षाचा सर्वात चांगला गुरु-पुष्य नक्षत्र लागणार आहे. असा  संयोग 2 ता 3 वर्षातून एकदा येतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे या नक्षत्रात सर्व संकट दूर होतात आणि या दिवशी करण्यात दान केल्याने सर्व काम यशस्वी ठरतात. राशीनुसार तुम्ही या गुरु पुष्य योगाचा कसा फायदा घेऊ शकता ते जाणून घेऊ.  
 
मेष राशी - या राशीच्या जातकांसाठी हा योग नोकरीत यश मिळवून देईल तसेच आर्थिक क्षेत्रात अतिरिक्त परिश्रम केल्याने धन लाभ होईल.  
 
वृषभ राशी - गुरु पुष्य योग या राशीच्या लोकांसाठी वैवाहिक जीवनात येणार्‍या अडचणींना दूर करेल तसेच जो व्यक्ती तुमच्यासाठी शत्रूचे काम करत आहे त्यांच्यापासून तुम्हाला सुटकारा मिळेल.  
 
मिथुन राशी - हा योग या राशीच्या लोकांसाठी फारच फायदेशीर ठरणार आहे कारण या राशीच्या लोकांचे काम बर्‍याच दिवसांपासून अडकलेले होते ते आता पूर्ण होतील. अतिरिक्त आयचे साधन प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.  
 
कर्क राशी- या योगामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. विवाह प्रस्ताव येऊ शकतात. करियरमध्ये उन्नती होईल. व्यवसायात उत्तम धन लाभ होईल.  
 
सिंह राशी - राजकारणात सन्मान वाढेल. भू संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार शक्य आहे. कुटुंबातील विवाद संपुष्टात येतील. शुभ वार्ता कानी पडेल. भौतिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. अडकलेले कामांना गती मिळेल.  
 
कन्या राशी - असा योग कन्या राशीच्या लोकांसाठी फारच कमी येतो म्हणून कन्या राशीच्या लोकांसाठी हा फारच शुभ योग आहे. नोकरीत प्रगती होईल, धन लाभ होईल तसाच जर कुठलेही न्यायालयीन खटले संपुष्टात आणायचे असेल तर हा गुरु पुष्य योग तुमच्यासाठी फारच उत्तम साबीत होईल.  
 
तुला राशी- साक्षात्कारात निवड होईल. विरोधी परास्त होतील. अडकलेले धन मिळेल. व्यवसायात अचानक लाभ मिळेल.  
 
वृश्चिक राशी - हा योग या राशीच्या लोकांसाठी पराक्रमात वाढ करवून देईल.   विरोधी परास्त होतील. करियरमध्ये प्रगती संभव आहे. व्यवसायात धन लाभ होईल.  
 
धनू राशी -लोकप्रियता वाढेल. भू संपत्तीत अडकलेले काम पूर्ण होतील. स्थायी लाभातून मार्ग निघेल. प्रवासाचे योग आहे.  
 
मकर राशी - या  योगा मुळे तुम्ही ज्या योजना आखाल त्यात यश मिळेल. पती- पत्नीतील बर्‍याच दिवसांपासून चालत असलेला विवाद कमी होईल आणि त्यांच्यात परस्पर प्रेम वाढेल.  
 
कुंभ राशी -सुख शांतीत वाढ होईल. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे.  
 
मीन राशी - विकास कार्यात यश मिळेल. इन्कमचे नवीन स्रोत मिळतील.   व्यावसायिक लाभामुळे मन प्रसन्न राहील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या कारणांमुळे येतात वाईट स्वप्न, जाणून घ्या त्याचे कारण आणि निवारण