rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाल किताबानुसार ग्रह नक्षत्रांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो जाणून घ्या

grah nakshtre  lal kitaab astro marthi
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (20:42 IST)
पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी ग्रह नक्षत्र आपला प्रभाव टाकतात. ज्या मुळे विविध प्रकारच्या प्रजाती, झाड-झुडपं आणि खनिजे जन्म घेतात. त्याच प्रमाणे हे ग्रह नक्षत्र आपल्या शरीरावर देखील सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकतात. जर आपल्या शरीरातील एखादे अवयव खराब होतं आहे तर हे माहित असावे की ते कोणत्या ग्रहाने प्रभावित होऊन असं होतं आहे तर आपण कदाचित त्या ग्रहासाठी काही न काही उपाय करू शकाल.
 
शरीरातील ग्रह -  
 
 1 शरीरात मेंदूच्या मध्यभागी सूर्याचा, डोळ्यात मंगळाचा, जीभ आणि दातांवर बुधाचा, वीर्यावर शुक्राचा, नाभीवर शनीचा, डोकं आणि तोंडावर राहूचा, गळ्यापासून हृदय पर्यंत आणि पायावर केतूचा, ह्रदयावर चंद्राचे आणि रक्तावर मंगळाचा प्रभाव असतो.
 
2 अशा प्रकारे बघावं तर शरीराच्या आतील पाण्यावर चंद्राचा, वायूवर गुरुचा आणि हाडांवर शनीचा प्रभाव आहे.
 
3 अशा प्रकारे हातातील कनिष्ठा बुधाची, अनामिका सूर्याची, मध्यमा शनीचे, तर्जनी गुरुचे आणि अंगठा शुक्राचे आहे. अंगठ्याच्या खालील जागा ही शुक्राची आहे. बोटांच्या प्रत्येक पोरांमध्ये राशींचे स्थान आहे. चारही बोटांमध्ये 12 पोर आहे.  
 
म्हणून शरीरास स्वस्थ ठेवणे महत्त्वाचे आहे. जेणे करून या ग्रहांचे आपल्यावर विपरीत परिणाम होऊ नये. चला तपशीलवार जाणून घेऊ या.
 
* सूर्य - शरीरात मेंदूच्या मधोमधले स्थान सूर्याचे आहे. सूर्याचा प्रभाव मेंदूवर आणि बुद्धी वर असतो. सूर्याचा प्रभाव  हाड, स्वादुपिंड, मेंदू, डोळे आणि ह्रदयावर असतो.
 
* चंद्र- चंद्राचा ह्रदयावर आणि शरीरातील पाण्यावर प्रभाव असतो. या मुळे मनावर परिणाम होतो. हे कल्पना करणं शिकवतो. चंद्र इच्छाशक्ती आणि फुफ्फुसांना प्रभावित करतो.  
 
* मंगळ-डोळ्यांवर आणि रक्तावर मंगळाचा प्रभाव आहे. जर हे दोन्ही चांगले आहे तर मंगळ देखील चांगला आहे. हे आपल्याला धैर्य आणि निर्भयपणा देतात. मंगळाचा परिणाम आपल्या घशावर, सत्व, सामर्थ्य आणि गुद्द्वारला देखील प्रभावित करतो.  
 
* बुध- जीभ, दात आणि नाकावर बुधाचा प्रभाव आहे. या मुळे आपली वाणी, वर्तन, आणि बुद्धिमत्ता नियंत्रित होते. बुध हा योग्य आणि विद्वान बनवतो. हा पचन तंत्र, त्वचा आणि वायूवर परिणाम करतो.  
 
* गुरु- नाक आणि शरीरातील वायू वर गुरुचा प्रभाव आहे. शरीरात चांगली वायू असेल तर ज्ञान आणि नशीब दोन्ही चांगले राहतात. गुरु हे ज्ञान, पित्त, आणि चरबीवर प्रभाव पाडतात.
 
* शुक्र - ह्याचा प्रभाव वीर्य, रस आणि त्वचेवर शुक्राचा प्रभाव आहे. हे चांगले असल्यावर व्यक्ती आकर्षक असतो तसेच तो संपत्ती आणि बाईचे सुख भोगतो. शुक्र आपल्या गुप्तांगावर देखील प्रभाव टाकतो.  
 
* शनी - हाड आणि नाभीवर शनीचा प्रभाव असतो. जर शरीरात हाड बळकट नसतील तर काहीही चांगले नाही. नाभी हे आपल्या जीवनातील केंद्र आहे. शनी चांगला असल्याचा अर्थ आहे व्यक्ती ज्ञानी आणि ध्यानी असणार. शनी गुडघे, टाच स्नायू आणि कफावर देखील प्रभाव टाकतात.
 
* राहू - डोक्यावर शिखराच्या स्थानी आणि तोंडावर राहूचा प्रभाव पडतो. राहू आपल्या आतड्यावर देखील प्रभाव टाकतो.  
 
* केतू - घशापासून हृदयापर्यंत आणि पायांवर केतूचा प्रभाव आहे. जर पाय कमकुवत आहे आणि दुखतात तर केतू अप्रभावी आहे. जर  चांगले आहेत ती व्यक्ती गूढ विद्येत चांगली होईल. केतू हे आपल्या आतड्यांवर देखील प्रभाव टाकतो.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुवारी ही 10 कामे करू नका, नुकसान झेलावं लागेल