Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

राहू काळात पूजा किंवा मंत्र जप करावा की नाही, जाणून घ्या

Rahu Kaal effects
, शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (09:23 IST)
राहू काळात पूजा मंत्र जप करावे किंवा नाही, राहुकाळ अखेर असतो तरी काय? राहुकाळात निषिद्ध कार्ये काय आहेत ते जाणून घेऊ या.
 
काय असतो राहू काळ :
राहू काळ हे स्थळ आणि तिथीनुसार वेगवेगळे असतात. म्हणजे दर वेळी वेगवेगळ्या काळात सुरू होतो. हा काळ कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी येतो, पण संध्याकाळी जरी आला तरी तो सूर्यास्ताच्या पूर्वीच येतो. राहू काळाची कालावधी दिवसाच्या 8 व्या भागा इतकी (सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत) म्हणजे राहू काळाची कालावधी दीड तासाची असते. या साठी दररोज 90 मिनिटाचा ठराविक काळ असतो. हा राहू काळ म्हणवतो. राहू काळ हे दिनमानाच्या आठव्या भागाचे नाव आहे. राहू काळाची वेळ एखाद्या ठिकाणच्या सूर्योदय आणि वारा वर अवलंबून असतं. 
 
राहू काळ कधी कधी असतो? 
रविवारी सायंकाळी 4.30 ते 6.00 पर्यंत, 
सोमवारी सकाळी 7.30 ते 9 वाजे पर्यंत 
मंगळवारी दुपारी 3.00 ते 4.30 पर्यंत, बुधवारी दुपारी 12.00 ते 1.30 वाजे पर्यंत
गुरुवारी दुपारी 1.30 ते 3.00 वाजे पर्यंत
शुक्रवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजे पर्यंत
आणि शनिवारी सकाळी 9.00 ते 10.30 वाजे पर्यंत ची वेळ राहू कालावधीची मानली जाते.
 
राहू काळाचा विचार दिवसातच करतात. काही लोकं रात्रीत देखील राहू काळ मानतात. पण हे योग्य नाही. राहू काळाचा विशेष विचार नेहमी रविवारी, मंगळवारी आणि शनिवारी आवश्यक मानले जाते. बाकीच्या दिवसात राहुकाळाचा प्रभाव विशेष नसतो.
 
राहू काळात काय करू नये -
1 या काळात यज्ञ, पूजा-पाठ करू नये, त्या मागील कारण असं की या काळात केलेली पूजा, ध्यान फलित होतं नाही. 
 
2 या काळात नवीन व्यवसायाला सुरू करू नये.
 
3 या काळात कोणत्याही महत्त्वाच्या कार्यासाठी प्रवास करू नये.

4 जर आपण या कालावधीत कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या काळात प्रवास करू नये. जर जाणं आवश्यक असल्यास तर पान, दही, किंवा काही गोड खाऊन घराच्या बाहेर पडावे. घरातून निघण्यापूर्वी 10 पावलं उलटे चालावे नंतर प्रवासासाठी निघावं.
 
5 या काळात खरेदी विक्री करू नये. या मुळे तोटा संभवतो.
 
6 राहू काळात लग्न, साखरपुडा, धार्मिक कार्य जसे की वास्तू शांत गृह प्रवेश सारखे शुभ कार्ये करू नये. जर एखादे शुभ कार्य करावयाचे असल्यास हनुमान चालीसा वाचून पंचामृत पिऊनच करावं.
 
7 या काळात केलेले कोणते ही शुभ कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होतं नाही. म्हणून या काळात शुभ कार्ये करू नये.
 
8 राहुकाळच्या दरम्यान अग्नी, प्रवास, कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये. पुस्तक लिहिणे बहीखात्याचे काम करू नये. 
 
9 राहू काळात वाहन, घर, मोबाईल, कॉम्पुटर, टेलिव्हिजन, दागिने आणि इतर कोणतीही मौल्यवान वस्तू विकत घेऊ नये. 

10 काही लोकांचा विश्वास आहे की राहुकाळात केलेले कार्य विपरीत आणि नकारात्मक फळ देतात.
 
काय करू शकतो - 
1 या काळात राहूशी निगडित काम सुरू करू शकतो.
2 राहू ग्रहाच्या शांतीसाठी किंवा राहू दोष दूर करण्यासाठी धार्मिक मंत्र पाठ करावे. 
3 कालसर्पाचा दोषाच्या शांती साठी उपाय करू शकता.
4 राहू चे यंत्र धारण किंवा राहू यंत्र दर्शन कार्य देखील करू शकतो.
5 ध्यान भक्तीच्या व्यतिरिक्त शांत राहू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरात मुंग्या निघण्याचे शुभ-अशुभ संकेत जाणून घ्या