Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन केरसुणी आणल्यावर लगेच हे करा, लक्ष्मी स्थिर राहील

नवीन केरसुणी आणल्यावर लगेच हे करा, लक्ष्मी स्थिर राहील
प्रत्येक व्यक्तीला धन वृद्धीची इच्छा असते परंतू अनेकदा काही लहानश्या चुकांमुळे घरात पैशांची आवक होऊ पात नाही. कमाई चांगली असली तरी पैसा कुठे खर्च होऊन जातो कळतच नाही. याचा अर्थ की घरात लक्ष्मी स्थिर होऊ पात नाहीये. तसेही देवी लक्ष्मी चंचल असते, जराशी चूक आणि देवी घर सोडून निघून जाते. अशात स्थिर लक्ष्मीसाठी काही उपाय करावे लागतात. त्यातून एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. 
 
झाडू अर्थात केरसुणी याला देवी लक्ष्मीचा प्रतीक मानले गेले आहे. म्हणतात घरात झाडू रुपी लक्ष्मीचा नेहमी सन्मान करावा ज्यामुळे घरात संपन्नता राहते. झाडू काढून दारिद्र्य अर्थात अलक्ष्मी घरातून बाहेर करता येते.
 
पण आपल्याला हे माहीत आहे का की झाडू खरेदी करून घरी आणण्याचे देखील काही विशेष दिवस असतात. इच्छे प्रमाणे कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ ठरू शकतं. मंगळवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस झाडू खरेदी करण्यासाठी योग्य आहे. याने स्थिर लक्ष्मी वास करते. 
 
एवढेच नव्हे तर झाडू जुनी झाली असल्यास कोणत्याही दिवशी बाहेर फेकण्यापेक्षा शनिवार हा सर्वात योग्य दिवस ठरेल. या दिवशी दारिद्र्य बाहेर केलं जातं. तसेच चुकूनही शुक्रवारी झाडू घरातून बाहेर फेकू नका. कारण शुक्रवार देवीचा वार आहे आणि या दिवशी झाडू रुपी लक्ष्मीला बाहेर फेकणे म्हणजे घरातील संपन्नता, स्थिरता विस्कटण्यासारखे आहे.
 
आता महत्त्तवाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणाल तर एक काम नक्की करावे. झाडूच्या दांडीवर अर्थात हँडलवर एक पांढरा दोरा बांधावा. पांढरा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी घराशी संबद्ध होऊन जाते आणि मग घर सोडून जात नाही. स्थिर होऊन जाते.
 
दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपल्यावर शनीची साडेसाती, ढैया किंवा दोष असल्यास शनिवारी झाडू खरेदी करण्याची चूक करू नका. याने शनीदेव अधिक नाराज होऊन जातील. आपण रविवारी झाडू खरेदी करू शकता. मात्र झाडू वापरणे शनिवार पासून सुरू करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तूनुसार काही गोष्टी देवघराच्या संदर्भात कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे