जून महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र आपली चाल बदलतील
ज्योतिष्यानुसार सर्व 9 ग्रह एके काळानंतर एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करतात. या ग्रहांच्या परिवर्तनामुळे सर्व राशींवर प्रभाव पडत असतो. जाणून घ्या जून महिन्यात होत असलेल्या राशी परिवर्तनामुळे 12 राशींवर काय प्रभाव पडत आहे:
सूर्य: ग्रहांचा राजा सूर्य जवळजवळ एक महिना एक राशी ते दुसर्या राशीत आपलं स्थान परिवर्तन करतो.
सूर्य जूनच्या पहिल्या 15 दिवस वृषभ राशी असणार नंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.
मंगळ : जूनच्या सुरुवातीस मकर राशीत गोचर करेल नंतर 27 जून ला ग्रह वक्री होईल.
बुध: 10 जूनला हा मिथुन राशीत प्रवेश करेल नंतर कर्क राशीत प्रवेश करेल.
शुक्र: 8 जूनला शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. इतर ग्रहांची स्थिती पूर्ववत राहील.
या 4 ग्रहांच्या परिवर्तनामुळे राशींवर काय प्रभाव पडेल जाणून घ्या:
मेष- ताण वाढू शकतो. कुटुंब आणि मित्रांमध्ये नाराजी राहेल. शासकीय क्षेत्रात समस्या राहील. व्यवसायात लाभ कमी मिळेल.
वृषभ- अचानक धन प्राप्तीचे योग आहे किंवा जुना अडकलेला पैसा मिळेल.
मिथुन- एखाद्या विशेष व्यक्तीसोबत भेट होऊ शकते ज्याने भविष्यात फायदा मिळेल.
कर्क- आपल्यासोबत एखादी दुर्घटना घडू शकते. वाहन चालवताना सावध राहा.
सिंह- नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
कन्या- शुभ समाचार मिळण्याचे संकेत आहे.
तूळ- मन प्रसन्न राहील. प्रतिकूल स्थितीवर विजय मिळेल. व्यवसायात धन लाभ होईल. घरात सुख नांदेल.
वृश्चिक- आत्मबल वाढेल. विरोधी पराभूत होतील. नोकरीत वर्चस्व राहील. व्यावसायिक लाभ मिळेल.
धनू- नोकरीत सन्मान वाढेल. कामात यश मिळेल. व्यवसायात लाभ कमी होईल. घरात शांती राहील.
मकर- आरोग्याकडे लक्ष द्या. कार्य क्षेत्रात वरिष्ठांसोबत मतभेद राहतील. व्यवसायात लाभ मिळेल. मन अशांत राहील.
कुंभ- उत्साहात वृद्धी होईल. कार्य विशेषमध्ये यश मिळेल. नोकरीत मन लागेल. व्यवसायात लाभ मिळेल.
मीन- धर्म कर्मात रुची वाढेल. काळजीपासून मुक्ती मिळेल. व्यावसायिक स्थिती व लाभ याने संतुष्ट राहाल.