Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 March 2025
webdunia

कालसर्प 'दोष' नव्हे 'योग'

कालसर्प 'दोष' नव्हे 'योग'
काळ या शब्दाचा अर्थ मृत्यू नव्हे. तसेच कालसर्प हा योग आहे, दोष नाही, हे प्रथम लक्षात घ्यावे. एकूण 12 प्रकारचे विशेष योग असतात. या योगाच्या अनेक सकारात्मक बाजूही आहे. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या मध्ये येतात तेव्हा त्याला कालासर्प योग म्हटले जाते. 

लाल पुस्तकातील पहिल्या भावात राज सिंहासन तर सातव्या भावात विवाहाचे घर दिले आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी या दोन्ही भावात राहु आणि केतू यांचे साम्राज्य होते. अर्थात जर सिंहासन असेल तर विवाह नाही आणि जर विवाह असेल तर सिंहासन मिळणार नाही. चुकून कोणी विवाहीत व्यक्ती देशाच्या सिंहासनावर बसला तर त्याची शिक्षा देशातील प्रजेला भोगावी लागेल, असे समजले जाते. परंतु, हा विषय संशोधनाचा आहे. मागील जन्माच्या कार्यामुळे हा योग सर्वांचा कुंडलीत 12 प्रकारे दर्शविला जातो. ज्याला कालसर्प योग आहे, त्याचा प्रभाव वयाच्या 45 वर्षपर्यंत राहतो. त्यानंतर त्याचा प्रभाव समाप्त होईल.

webdunia
WD
कालसर्प योगाचा दुष्प्रभाव टाळण्यासाठी.....

आपले आचरण चांगले असू द्या.
माता पित्यांची सेवा करा. त्यांचे आशीर्वाद घेत जा.
ब्राह्मणाकडून कालसर्प योग निघून जाण्यासाठी विधी करून घ्या.
हा योग उग्र स्वरूपात असेल तर तो विधी तीन ते पाच वेळा करावा लागतो.
पंचमीचे व्रत करून नवनाग स्त्रोत्र पठण करा.
शिवोपासना करा व दरवर्षी रूद्राभिषेक करा.
वडाला रोज १०८ प्रदक्षिणा घाला.
शिवलिंगावर तांबे वहा.
नाग-नागिणीचा जोडा गंगेत सोडून द्या.
सर्प सूक्ताचे नित्य पठण करा.
नागबली व नारायण बली विधी करा.
प्रत्येक अमावस्येला पितृ पूजन व तर्पण करा.
गायत्री मंत्र वा नाग गायत्रीचा पाच लाख जप करा.
रोजच्या जेवणातील पहिली पोळी गाय, कावळा वा कुत्र्याला खाऊ घातल्यानंतर मगच भोजन करा.
घराच्या दरवाजावर शुभ चिन्ह लावा.
सफेद चंदनाचा टिळा रोज लावा.

कालसर्पयोगाविषयी अधिक माहिती येथे जाणून घ्या. (व्हिडीओसुद्धा पहा.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरात सुख-शांतीसाठी काही वास्तू टिप्‍स