Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदी राहण्यासाठी हे 4 रंग आपल्या आयुष्यात सामील करा

आनंदी राहण्यासाठी हे 4 रंग आपल्या आयुष्यात सामील करा
, सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (16:45 IST)
रंगांचं आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे. शास्त्रज्ञाच्या मते मुळात 5 रंगच असतात. काळा, पांढरा, लाल, निळा आणि पिवळा. काळा आणि पांढरा रंग मानणे ही आपली विवशता आहे. परंतु हा रंग नाही. अश्या प्रकारे तीनच रंग वाचतात. लाल, निळा, पिवळा.
 
आपण अग्नीमध्ये याच तीन रंगांना बघता. जेव्हा एखादा रंग फिकट किंवा पुसट होतो तेव्हा तो पांढरा होतो आणि जेव्हा एखादा रंग गडद होतो तेव्हा तो काळपट किंवा काळा होतो. लाल रंगात पिवळा रंग मिसळा तर तो केशरी बनतो, निळ्या रंगात पिवळा मिसळा तर तो हिरवा रंग बनतो. अश्या प्रकारे निळा आणि लाल मिसळून जांभळा बनतो. नंतर हे हजारो रंग या प्रमुख रंगापासूनच उद्भवले आहेत.
 
हिंदू धर्मात केशरी, पिवळा, गेरू, भगवा आणि लाल रंगाला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. गेरू आणि भगवा रंग तर एकच आहे पण केशरीमध्ये थोडा फरक जाणवतो. 
 
1 पिवळा रंग - पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हणतात. या अंतर्गत आपण नारंगी आणि केशरी रंगाला देखील सामील करू शकता. यामुळे गुरुचा बळ वाढतो. गुरु आपल्या भाग्याला जागृत करणारे ग्रह आहेत. कोणत्याही प्रकाराच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग वापरला जातो. पूजेमध्ये पिवळा रंग शुभ मानतात. केशरी किंवा पिवळा रंग सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. हे प्रकाश देखील दर्शवतात. अश्या प्रकारे पिवळा रंग बरंच काही बोलतो. 
 
शास्त्रज्ञांच्या मते, पिवळ्या रंगाचा वापर केल्यामुळे आपल्या रक्तातील लाल आणि पांढऱ्या पेशींची वाढ होते. म्हणजे रक्तात हिमोग्लोबिन वाढू लागत. शास्त्रज्ञांच्या मते, पिवळा रंग रक्त रक्ताभिसरण वाढवत. थकवा दूर करतं, पिवळ्या रंगाच्या संपर्कात राहिल्यामुळे रक्त कणांच्या निर्मितीची प्रक्रिया वाढते. सूज, टॉन्सिल्स, टायफाईड, नाडीशुल, अपचन, उलट्या, कावीळ, रक्तरंजित मूळव्याध, अनिद्रा आणि डांग्या खोकला या सर्व व्याधींचा नायनाट होतो. 
 
पिवळ्या रंगाचा संबंध विरक्तीशी असतं. तिथे हे शुद्धता आणि मैत्रीशी देखील निगडित असतो. वैवाहिक जीवनात आणि आपल्या शयनकक्षात पिवळ्या रंगाचे वापर करू नये. स्वयंपाकघरात आणि बैठकीच्या खोलीत या रंगाचा वापर करावा. घराची फरशी पिवळ्या रंगाची ठेवू शकतो.
 
पिवळ्या रंगात फळ आणि भाज्यांमध्ये पपई, संत्री, अननस, शिमला मिर्च, कॉर्न, मोहरी, भोपळा,लिंबू, पीच, आंबा, खरबूज इत्यादी वापरून आपण अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, बायोफ्लैवेनॉइड्स, आणि व्हिटॅमिन सी ला आपल्या शरीरात जागा देतो. हे त्वचेला तरुण राखत आणि त्याच बरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं. या व्यतिरिक्त हे हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या समस्येसाठी देखील फायदेशीर आहे. हे डोळ्यांच्या समस्ये मध्ये देखील फायदे देतं.
 
2 लाल रंग - लाल रंगात केशरी किंवा भगवा रंग देखील वापरू शकता. यामध्ये अग्नीच्या रंगांचा देखील समावेश असतो. शरीरात रक्त महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मात बायका लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालतात. या व्यतिरिक्त लग्नाच्या वेळी नवरदेव देखील लाल किंवा केशरी रंगाची पगडी घालतो, जे त्याच्या येणाऱ्या जीवनाच्या आनंदाशी निगडित असतं. लाल रंग उत्साह, सौभाग्य, आनंद, धैर्य आणि नवीन आयुष्याचे प्रतीक आहे. 
 
प्रकृतीमध्ये लाल रंग किंवा त्या रंग गटाचे फूल अधिक प्रमाणात आढळतात. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतं. आई लक्ष्मी ही देखील लाल कपडे घालते आणि लाल रंगाच्या कमळावर असते. राम भक्त हनुमान यांना देखील लाल आणि शेंदुरी रंग आवडतं. म्हणून भाविक त्यांना शेंदुर अर्पण करतात. आई दुर्गाच्या मंदिरात देखील आपल्याला लाल रंग बरेच दिसून येतात. 
 
भगवा रंग सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा देखील आहे, म्हणजे हा रंग हिंदू चिरंतन, सनातनी पुनर्जन्माच्या धारणांना सांगणारा रंग आहे. भगवा रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. शिवाजींच्या सैन्याचं झेंडा, राम आणि कृष्ण आणि अर्जुन यांचा रथाच्या झेंड्यांचा रंग देखील भगवाच होता. हा भगवा रंग शौर्य, त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. 
 
सनातन धर्मात भगवा रंग ते साधू धारण करतात, जे मुमुक्ष द्वारे मोक्षाच्या मार्गावर चालण्याचा दृढनिश्चय केलेले असतात. असे संन्यासी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबीयांचा पिंडदान करून सर्व प्रकारच्या मोहाचा त्याग करून आश्रमात राहतात. भगवा वस्त्रांना संयम, दृढनिश्चय आणि आत्मसंयमाचे प्रतीक देखील मानले जाते. 
 
घराच्या भिंतींवर लाल रंग नसावा. झोपण्याचा खोलीत चादरी, पडदे आणि मॅट्स देखील लाल नसावे. लाल रंगाचा वापर अत्यंत काळजी पूर्वक करावा. लाल रंगाच्या सम कोणतेही दुसरे रंग निवडा. लाल रंगाचा वापर कुठे करायला हवं आणि कुठे नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण हा लाल रंग उत्साहला क्रोधात कधीही बदलू शकतं. 
 
लाल रंगाच्या फळ आणि भाज्यांमध्ये लायकोपिन आणि अँथेसायनिन असतं, जी कर्करोगाची शक्यता कमी करते त्याच बरोबर आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्यास मदत करते. हे शरीरास आवश्यक ऊर्जा देखील देतं, जे आपल्याला ताजे ठेवतात. या साठी आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट, शिमलामिर्च, स्ट्रॉबेरी, कलिंगड, सफरचंद, चेरी, आलुबुखारा, इत्यादी देखील सामील करू शकतात.
 
3 पांढरा रंग : शुभ्र किंवा पांढरा हा आत्म्येचा रंग आहे. यामध्ये किंचित निळसरपणा देखील असतो. भारतीय योगींच्या मते आत्म्याचा रंग शुभ्र म्हणजे पांढरा असतो. काही पाश्चात्त्य योगींच्या मते आत्मा ही जांभळ्या रंगाची असते. काही विचारवंत असे मानतात की निळा रंग हा आज्ञा चक्राचं आणि आत्म्याचा रंग आहे. निळ्या रंगाच्या प्रकाशच्या रूपात आत्मा दिसते. आणि पिवळ्या रंगाचा प्रकाश हे आत्म्याचा उपस्थितीला दर्शवतो. 
 
पांढरा रंग हा देवी आई सरस्वतीचा आहे. या मुळे राहू शांत असतो. घरात पांढऱ्या रंगांचा वापर करण्यापूर्वी काही वास्तूंचे नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्राचीन काळात यज्ञाच्या वेळी पांढऱ्या रंगाचा वापर केलं जात असे. पांढऱ्या रंगाने मनाला आनंद आणि शांती मिळते. तसेच शुद्धता आणि पावित्र्याचा अनुभव होतो. पश्चिमी देशात लग्नाच्या वेळी वधू पांढरा रंगाचा गाऊन घालतात. तसेच भारत सारख्या देशात जेव्हा एखादा मरण पावतो त्यावेळी त्या ठिकाणी पांढरे घालण्याची पद्धत आहे. या उलट पश्चिमी देशात एखाद्याचे मरण झाल्यावर त्या ठिकाणी काळा रंग घालण्याची पद्धत आहे. 
 
पांढऱ्या रंगाच्या भाज्या आणि फळ आपल्या आहारात समाविष्ट केल्यानं कर्करोग आणि ट्युमरचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त हे हृदयाला निरोगी ठेवण्याबरोबरच शरीरातील चरबीची पातळी देखील नियंत्रित करतात. या मध्ये अ‍ॅलिसिन आणि फ्लाव्हानॉइड मुबलक प्रमाणात आढळतात. पांढऱ्या रंगाला आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी आपण केळी, मुळा, बटाटा, कोबी, लसूण, कांदा, नारळ, मश्रुम देखील वापरू शकता. 
 
4 निळा रंग : संपूर्ण जगात निळा रंग सर्वात जास्त आहे. पृथ्वीवर 75 टक्के पाणी पसरल्यामुळे निळा रंगाचा प्रकाशच पसरला आहे. म्हणून आपल्याला आभाळ देखील निळा दिसतो. ध्यान करताना आपल्याला काळोखात निळा आणि पिवळा रंग दिसू लागतो. जर आपण गुलाबी रंग बघाल तर त्यामध्ये आपल्याला लाल, पांढरा आणि निळा रंग दिसेल. 
 
निळा रंग आध्यात्म आणि नशिबाशी निगडित आहे. याचा वापर देखील विचार करून केला पाहिजे. शुद्ध निळा रंग कधीही वापरू नये. निळाच्या बरोबर पिवळा, पांढरा आणि फिकट लाल रंग वापरू शकता. आपण कोणत्याही ज्योतिषाला विचारून निळ्या रंगाचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केलं तरच हे आपल्याला जीवनात यश मिळवून देईल.
 
अँथोसायनिनने समृद्ध असलेले निळे किंवा जांभळे रंगाचे फळ आणि भाज्या आपल्या त्वचेला निरोगी आणि तरुण ठेवण्यात मदत करतं. हे हृदयरोगांसाठी देखील फायदेशीर असतं. आणि कर्करोगाच्या धोक्याला कमी करतं. या साठी आपण जांभूळ, काळे द्राक्ष, आलू बुखारा, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, वांगी आणि या रंगाच्या इतर पालेभाज्या आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. तसे आमचा सल्ला असा आहे की आपण निळे किंवा जांभळ्या रंगाच्या भाज्या विचार करूनच सेवन कराव्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 4 ते 10 ऑक्टोबर 2020