Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

अत्यंत आवश्यक आहे पशू-पक्षी आमच्या सुखी जीवनासाठी, जाणून घ्या 9 आश्चर्यकारक गोष्टी

lucky birds
आजच्या हायटेक युगात ही अनेक लोकं प्राण्यांच्या रंगासोबत शुभ-अशुभ जोडून बघण्याचा प्रयत्न करतात. घणात कोणाही प्राणी किंवा पक्षी पाळण्यापूर्वी लोकं ज्योतिष सल्ला घेणे विसरत नाही. कारण यांच्यात अनिष्ट तत्त्वांवर ताबा ठेवण्याची अद्भुत शक्ती असते. या ब्रह्मांडात व्यापलेल्या नकारात्मक शक्तींना निष्क्रिय करण्याची योग्यात या पाळीव प्राण्यांमध्ये असते.
 
1. मनुष्याच्या सर्वात विश्वासू मित्र कुत्रा नकारात्मक शक्तींना नष्ट करू शकतो. त्यातून काळा कुत्रा सर्वात उपयोगी सिद्ध होतो. प्रसिद्ध ज्योतिषी जयप्रकाश लाल धागेवाले म्हणतात की- 'संतान प्राप्ती होत नसल्यास काळा कुत्रा पाळल्याने संतान प्राप्ती होते.' तसेच काळा रंग अनेक लोकांना आवडत नसला तरी हा शुभ आहे.
 
2. काळ्या कावळ्याला आहार दिल्याने अनिष्ट व शत्रू नाश होतो. पण कावळा भित्रा असून मनुष्याला खूप घाबरतो. कावळ्याला एकाच डोळ्याने दिसतं. शुक्र देवता देखील एकांक्षी आहे. शुक्र सारखेच शनी देव आहे. त्यांचीही एकच दृष्टी आहे. म्हणून शनीला प्रसन्न करायचं असल्यास कावळ्याला भोजन करवावे. 
 
घरावर कावळा बोलत असल्यास पाहुणे नक्की येतात. परंतू कावळा घराच्या उत्तर दिशेत बोलल्यास घरात लक्ष्मी येते आणि पश्चिम दिशेत पाहुणे, पूर्व दिशेत शुभ बातमी तर दक्षिण दिशेकडे बोलल्यास वाईट बातमी मिळते.
 
3. आमच्या शास्त्रात गायीबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत जसे शुक्राची तुलना सुंदर स्त्रीशी केली जाते. याला गायीशी जोडले गेले आहे. म्हणून शुक्राच्या अनिष्टापासून बचावासाठी गो-दान केलं जातं. ज्या जागेवर घर बांधायचं असलं त्या जागेवर पंधरा दिवस गाय-वासरू बांधल्याने ती जागा पवित्र होते. त्या जागेवर असलेल्या आसुरी शक्तींचा नाश होतो.
 
4 . पोपटाचा हिरवा रंग बुध ग्रहाला जोडून बघण्यात आला आहे. म्हणून घरात पोपट पाळल्याने बुधाची कुदृष्टीचा प्रभाव दूर होतो. घोडा पाळणे देखील शुभ आहे. घोडा पाळणे सहज नाही म्हणून काळ्या घोड्याची नेल घरात ठेवल्याने शनी कोप पासून बचाव होऊ शकतं.
 
5. मासोळ्या ठेवल्याने आणि त्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घातल्याने अनेक दोष दूर होतात. यासाठी सात प्रकाराच्या कणकेचे पिंड तयार करावे. आपल्या वयाच्या संख्येत पिंड शरीरावरून ओवाळून घ्या मग वयाच्या संख्येप्रमाणेच गोळ्या तयार करून मासोळ्यांना खाऊ घालावे.
 
घरात फिश-पॉट ठेवल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. मासोळी आपल्या मालकावर येणार्‍या विपदा स्वत:वर घेते असे म्हणतात.
 
6. कबूतरांना शिव-पार्वती चे प्रतीक रूप मानले आहेत, परंतू वास्तुशास्त्राप्रमाणे कबूतर खूप अपशगुनी मानले जाते.
 
7. विश्वातील अनेक देशांमध्ये मांजर दिसणे अपशगुन मानले गेले आहे. काळी मांजर अंधाराचे प्रतीक मानले आहे. परंतू विचित्र बाब ही आहे की ब्रिटन येथे काळी मांजर शुभ मानली जाते.
 
8. शेवटी कुत्र्याबद्दल एक आणखी गोष्ट म्हणजे की कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते आणि कुत्रा घरातील आजारी सदस्याचा आजार स्वत:वर घेऊन घेतो.
 
9 . गुरुवार हत्तीला केळी खाऊ घातल्याने राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुची जागा आणि झाडे