Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्रग्रहण 2020 : 5 जून रोजी चंद्रग्रहण, 5 खबरदाऱ्या आणि 5 उपाय

webdunia
बुधवार, 3 जून 2020 (12:51 IST)
यंदाच्या वर्षी 2020 मध्ये 4 चंद्रग्रहण सांगितले आहेत. पंचंगातील भिन्नतेमुळे प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी सांगितली आहे. पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारी रोजी झाले होते, दुसरे 5 जून रोजी होणार आहे, तिसरे 5 जुलै रोजी होणार आहे आणि चवथे 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा शुक्रवार 5 जून रोजी मध्यरात्री ग्रहण असणार आहे. हे मध्य रात्री 11 वाजून 15 मिनिटापासून सुरू होणार आणि 6 जून ला 2 वाजून 34 मिनिटापर्यंत राहणार. या ग्रहणाची कालावधी 3 तास 19 मिनिटाची असणार. 
 
चला तर मग जाणून घेऊया 5 जून रोजी लागणाऱ्या या चंद्रग्रहणाविषयीच्या काय दक्षता घ्यावयाच्या आहेत.
 
5 दक्षता 
1 ग्रहण काळात कोणतेही नवे काम सुरू करू नये.
2 ग्रहण काळात तुळशीला स्पर्श करू नये.
3 ग्रहण काळात उपवास करावे आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावे. 
4 ग्रहण काळात ब्रश करणे, कंगवा करणे आणि मलमूत्र विसर्जन करणे टाळावे.
5 ग्रहण काळात गरोदर बायकांनी तीक्ष्ण धार असलेल्या वस्तूंचा वापर करू नये.
 
चंद्रग्रहणासाठीचे 5 उपाय
1 ग्रहण काळात धार्मिक आणि प्रेरणादायक पुस्तके वाचायला हव्या.
2 ग्रहण काळाच्या वेळेस आपल्या इष्ट देवाच्या मंत्राचे जप करायला हवे.
3 ग्रहण संपल्यावर पूर्ण घरात गंगा जल शिंपडावे.
4 ग्रहण संपल्यावर एखाद्या गरिबाला देणगी द्यावी.
5 ग्रहण संपल्यावर मेहतराला नवी केरसुणी आणि नाणं देणगी म्हणून द्यावं. 
 
चंद्रग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठीचे काही उपाय 
1 सोमवार आणि प्रदोषाचे उपास करावे.
2 दाढी आणि केस वाढवू नये (वेणी ठेवू नये).
3 सोमवारी केशराची खीर खावी आणि कुमारिकांना देखील खाऊ घालावी.
4 सोमवारी पांढरे कपडे देणगी म्हणून द्यावे.
5 महादेवाची पूजा करावी आणि तांदूळ देणगीमध्ये द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

या महिन्यात दोन ग्रहण, प्रभावशाली राहील 21 जून रोजी लागणारं सूर्य ग्रहण, हे उपाय करावे लागणार