आपल्याला बहुतेकच माहीत असेल की तंत्र क्रियांसाठी अनेक प्रकाराचे शिवलिंग असतात. वेगवेगळ्या इच्छा पूर्तीसाठी वेगवेगळ्या शिवलिंगाची पूजा केली जाते. जाणून घ्या विस्तारपूर्वक...
जर एखाद्या व्यक्तीला अकाल मृत्युची भीति असल्यास दूर्वा गुंथून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन पूजा केली जाते.
जीवन-मरणाच्या चक्रापासून मुक्तीसाठी भक्त आवळ्याने निर्मित शिवलिंगाला रुद्राभिषेक करतात.
तंत्र-मंत्र किंवा विशेष सिद्धी प्राप्तीसाठी यज्ञ भस्माने शिवलिंग तयार करून पूजा करावी.
संतान सुख हवं असणार्यांनी जव, गहू आणि तांदूळ समान प्रमाणात मिसळून या मिश्रणाने शिवलिंग निर्मित करून पूजा करतात.
कोणालाही आपल्या वशमध्ये करण्यासाठी मिरची, पिंपळाच्या चूर्णात मीठ मिसळून शिवलिंग निर्मित करून पूजा करतात.
शत्रूंचा नाश करण्यासाठी लहसुनियाने निर्मित शिवलिंगाची पूजा केली जाते. याने शत्रूंवर विजय मिळते.
पिंपळाच्या लाकडाने शिवलिंग तयार केलं जातं. दारिद्र्य दूर करण्यासाठी पिंपळाच्या लाकडाने शिवलिंग बनवून त्याची पूजा केली जाते.
सुख-समृद्धी मिळवण्यासाठी सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. सोन्याच्या पिंडीची पूजा केल्याने अपार धन संपदा प्राप्ती होते.