मंगल-राहूच्या युतीमुळे रोहिणी नक्षत्रात बनत आहे अनिष्टकारी अंगारक योग

मंगळवार, 22 मे 2018 (12:02 IST)
ज्योतिष शास्त्रात काही विनाशकारी योग देखील असतात जे काही खास नक्षत्र-ग्रहांच्या युतीमुळे अमंगलकारी परिस्थिती निर्मित करतात. अशाच एक योग 25 मे रोजी बनणार आहे ज्यात फक्त काही राशीच्या जातकांचे अमंगल होईल बलकी बर्‍याच प्राकृतिक आपदा, अपघात आणि अनिष्ट होण्याची शक्यता देखील आहे.
 
1 मे पासून मंगळ व केतू मकर राशीत एकत्र आहे जे 6 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. मंगळाचे धनू राशीत असल्याने मंगळ-राहूचे दृष्टी संबंध बनत आहे, मंगळ आणि केतू एकाच राशीत असल्याने अंगारक योग देखील बनत आहे. या योगामुळे 25 मे ते 8 जूनमध्ये येणारे रोहिणी नक्षत्रात भीषण गर्मी, वादळ वारे, आगजनी, अपघात आणि राजनैतिक बदल होण्याची परिस्थिती बनेल.
 
या अनिष्टकारी अंगारक योगामुळे मिथुन, कर्क, सिंह, तुला, धनू आणि कुंभ राशीच्या लोकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. पण प्रत्येक राशीला नुकसान होईल हे ही आवश्यक नाही. मेष, कन्या आणि मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ संमिश्रित जाणार आहे तर वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीसाठी हा काळ फारच श्रेष्ठ राहील.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दैनिक राशीफल 22.05.2018