Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगळाचा राशी परिवर्तन, जाणून घ्या प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव...

मंगळाचा राशी परिवर्तन, जाणून घ्या प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव...
श्री रामानुज 
 
मंगळाला धरतीपुत्र म्हटले जाते, प्राचीन ज्योतिष्यामध्ये याला भुमिपुत्र आणि युद्धाचे देवता देखील मानले जात होते. मंगळ अंतरीक्षामध्ये नग्न डोळ्यांचे देखील स्पष्ट दिसून येतो. मंगळाचा पृथ्वीवर जवळचा संबंध असल्यामुळे याचा प्रभाव सर्व राश्यांवर अवश्य पडतोच. 13 एप्रिल रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत आहे. प्रात: 4 वाजून 12 मिनिटाने मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत जाणार आहे. जाणून घेऊ तुमच्या राशीवर त्याचा काय प्रभाव पडेल : 
 
मेष राशीच्या जातकांच्या राशीचा स्वामी स्वयं मंगळ आहे जे स्वराशितून परिवर्तन करणार आहे. अशात मेष जातकांसाठी मंगळाचा परिवर्तन उत्तम आहे. धनलाभ होईल. यात्रेचा योग आहे. घरात एखादे शुभकार्य होतील. सूर्य नक्षत्र कृत्तिकांमध्ये मंगळाचा परिवर्तन असल्याने अविवाहित मेष जातकांचे विवाह जुळण्याचे योग आहे.  
 
वृषभ राशीच्या जातकांसाठी लग्नाचा मंगळ होणे शुभकारी आहे. ऊर्जावान राहाल. व्यवसाय वाढण्याचे योग आहे. अविवाहित जातकांचे विवाह जुळण्याचे योग देखील आहे. विद्यार्थ्यांना मंगळ खास करून चांगले परिणाम देईल.  
 
मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळाचा परिवर्तन 12वा होईल. खर्च वाढेल पण कठिण वेळेसाठी धन संचय करून ठेवा. परिजनांवर खर्च करावे लागणार आहे. राशी परिवर्तनामुळे मंगळ शत्रूवर विजय मिळवण्यास सहायक होऊ शकते. प्रवासाचा योग आहे.   
 
कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळाचा वृषभ राशीत परिवर्तन शुभ ठरणार आहे. सौभाग्यशाली योग असतील. धन प्राप्तीचे योग येतील. आयटी क्षेत्रातील लोकांना उत्तम फळ मिळेल. योगकारी मंगळाचे लाभ स्थानात आल्याने लाभ प्राप्तीची संधी मिळेल.  
 
सिंह राशीच्या जातकांसाठी हे राशी परिवर्तन लाभाहून कर्माकडे होत आहे. लाभ मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. ऊर्जेचा संचार राहील. नवीन लक्ष्य गाठण्यासाठी थोडे तत्परता दाखवावी लागणार आहे. मेहनत आणि त्वरित कार्य करण्याची प्रवृत्तीमुळे लाभ मिळू शकतो.  
 
कन्या राशीच्या जातकांसाठी हा परिवर्तन थोडा दिलासा देणारा आहे. मागील काही वेळेपासून अपघात आणि रोगींना मंगळाच्या परिवर्तन वृषभ राशीत आल्याने निश्चितच आराम मिळेल . भाग्यात वाढ होईल. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल.  
 
तुला राशीच्या जातकांसाठी मंगळ आठव्या भावात येत आहे. हे एखादे अनिष्ट होण्याचे संकेत देत आहे. प्रवास किंवा वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. एखादी सर्जरी देखील करावी लागू शकते. मंगळाचे दान केल्याने थोडा आराम मिळण्याची शक्यता आहे.  
 
वृश्चिक राशीच्या जातकांना दांपत्य जीवनात अडचण येऊ शकते. शक्य असल्यास कुठल्याही विवादात पडू नये. आरोग्य संबंधी तक्रार दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित जातकांचे विवाहाचे योग जुळून येत आहे. घरात एखादे शुभ कार्य  होण्याची शक्यता देखील आहे.  
 
धनू राशीच्या जातकांसाठी मंगळाचे परिवर्तन रोगवर्धक होऊ शकत. तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे की आरोग्याची काळजी घ्या. पण शत्रू तुमच्यावर हावी राहणार आहे. प्रवास घडू शकतो. आर्थिक स्थितीला उत्तम बनवण्यासाठी खर्चांवर नियंत्रण करावे लागणार आहे.  
 
मकर राशीच्या जातकांसाठी मंगळाचे परिवर्तन मान-सन्मानात व संतानासाठी उत्तम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी शुभ ठरणार आहे. नवीन कामांची सुरुवात मंगळकारी राहणार आहे. धन प्राप्तीचे योग आहे.  
 
कुंभ राशीच्या जातकांसाठी मंगळाचा परिवर्तन संपती बनवण्याचे योग दिसून येत आहे. घर खरेदीचा योग बनत आहे. एखाद्या नवीन कामाची योजना आखण्यात यशस्वी व्हाल. मातृपक्षाकडून प्रेम वाढेल. मित्रांचा साथ मिळेल. 

मीन राशीच्या जातकांचे मंगळ राशीचे परिवर्तन करणे तुमच्या भाग्यात वाढ करण्याचे संकेत आहे. नोकरीत बदल किंवा नवीन काम करण्याचे इच्छुक असाल तर योग्य संधी मिळेल. या वेळेस प्रतिस्पर्धिंवर हावी होणे आणि शत्रूला पराजित करण्याच योग बनत आहे. एकूण मंगळ सुख-समृद्धीचा योग बनवत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरा बायकोत विवादाचे कारण बनू शकतो एक्‍वेरियम!