बुध ग्रह दोन जून रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल, जाणून घ्या कोणत्या राशींवर होईल काय परिणाम

शनिवार, 25 मे 2019 (15:26 IST)
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जाणार्‍या बुधाचे राशी परिवर्तन झाले आहे. तो आपल्या वैचारिक शत्रू राशी मेषमधून मित्र शुक्राची राशी वृषभामध्ये पोहोचला आहे. यानंतर तो आपल्या घरात अर्थात मिथुन राशीत दोन जून रोजी येईल. बुध या वेळेस आपली नीच आणि शत्रू राशीत फिरत आहे.  
 
शिक्षा-व्यापारात विशेष लाभ: बुधाच्या या राशी परिवर्तनामुळे बुधादित्य योग व गुरुसोबत बुधाचा समसप्तक योग बनत आहे. यामुळे व्यापार व शिक्षा जगतात फायदा होईल. होटल, वस्त्र, अन्न व्यापार्‍यांसोबत सर्विस इंडस्ट्रीजमध्ये विशेष उन्नती दिसेल. 
 
सहा राशींच्या लोकांना जास्त फायदा : बुध चंद्र राशीतून दुसर्‍या, चवथ्या, सहाव्या, आठव्या, दहाव्या आणि अकराव्या भावात भ्रमण करत असेल तर त्याचे चांगले परिणाम मिळतात. बुधाचा हा राशी परिवर्तनामुळे मेष, कर्क, सिंह, तुला, धनू व कुंभ राशीच्या लोकांना जास्त फायदा मिळेल.   
 
बुध राशीची खासियत : बुधाची आपली मिथुन व कन्या राशी असते. तो आपली राशी कन्यामध्ये उच्चाचा असतो, जेव्हा की गुरुची मीन राशीत नीच असतो. बुधाचे आपले  नक्षत्र आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती आहे. शिक्षांमध्ये गणित, बुद्धी व व्यापाराचे कारक तत्त्व आहे बुध.  
 
मेष : आर्थिक उन्नती, स्वास्थ्य लाभ 
 
वृषभ : मित्रांकडून विरोध, अपयश
 
मिथुन : व्यर्थ विवाद, प्रतिष्ठेत कमतरता  
 
कर्क : लोकप्रियता, धन-वैभव वृद्धी
 
सिंह : व्यापार, कुशल वाक्पटुता 
 
कन्या : प्रवासात कष्ट, पित्त विकार
 
तुला : धन, संतानं संबंधी लाभ
 
वृश्चिक : त्रास, कोपभाजन
 
धनू : वस्त्र, आभूषण लाभ, प्रतियोगितेत यश  
 
मकर : बायकोशी मतभेद, परिवारात क्लेश
 
कुंभ : संचित धनात वाढ 
 
मीन : बंधू-बांधवांशी द्वेष, मन अशांत 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख 3 जून रोजी शनी जयंतीला चढवा ह्या 4 वस्तू, दूर होतील सर्व समस्या