Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संख्याशास्त्रानुसार श्रीमंत मूलांक 6

संख्याशास्त्रानुसार श्रीमंत मूलांक 6

वेबदुनिया

मूलांक ६ हा संख्याशास्त्रानुसार सर्वाधिक श्रीमंत अंक मानला जातो. याचा स्वामी शुक्र असून, शुक्राला असुरांचा किंवा असुरी
शक्तीचा गुरू मानलं जातं. एकूणच काय तर, हा श्रीमंत मूलांक तर आहेच. पण हा सर्वाधिक यशस्वी मूलांकही मानला जातो.

मूलांक ६ असणारे लोक दिसायला सुंदर व आकर्षक असतात. जर या व्यक्तींचा जन्म रविवार, सोमवार किंवा शुक्रवार या दिवशी झाला असेल तर हे लोक दिसायला गोरे असतात. एकूणच यांच्या रूपाकडे लोक स्वतहून आकर्षित होतात. मनमोहक असे यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व असल्याने यांच्या आसपास असणाऱ्या लोकांशी यांचे दृढ संबंध निर्माण होतात.

जसे की, या व्यक्ती प्रेम करतात त्या व्यक्तीचे गुलाम बनून राहतात. परंतु एकदा का संबंध तुटले की, या व्यक्ती मागे वळूनही पाहात नाहीत. यांच्या प्रेमात शुद्ध प्रेम असून वासना अधिक प्रमाणात नसते. यांच्याकडून एकूणच अनेक नवीन सूचना आणि इतर माहिती ऐकायला मोठय़ा प्रमाणात मिळते. काम आणि त्याअनुसार येणाऱ्या गोष्टींबाबत हे लोक कुठलीही टाळाटाळ करत नाहीत. संगीत आणि या कलेच्या प्रेमींना डार्क रंग अधिक आवडतात. यांचे राहणीमान हे उंची असून यांना उत्तम घर, घरातील इंटिरीअर, दागिने, घडय़ाळं आणि महागडी वस्त्रं यांचा शोक मोठय़ा प्रमाणात असतो. या सर्व गोष्टींवर यांचा खर्च मोठय़ा प्रमाणात होतो. यामुळेच क्वचित प्रसंगी यांना पैशाची कमीही भासते.

webdunia
WD


गुण: कुठलंही काम असो त्यात लक्ष देणं आणि त्यात स्वतला झोकून देणं हा यांचा महत्त्वाचा गुण आहे. लोकांशी आदराने वागणं आणि त्याचबरोबर दयाळूपणा हाही त्यांच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. कितीही पाहुणे घरी आले तरी यांना कंटाळा येत नाही. पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात कुठलीही कसर सोडत नाहीत.

अवगुण: विनाकारण एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करणे हा यांच्यातील सर्वात मोठा अवगुण आहे. ऐहिक सुखाच्या मागे लागल्यामुळे ते स्वतकडे असणारी साठवलेल्या संपत्तीचा अपव्यय करतात. समोरच्यावर अनेकदा डोळे झाकून विश्वास ठेवल्यामुळे यांना तोटाही सहन करावा लागतो. स्वतच्या विचारांवर अडून राहण्याचा हट्टीपणा यांच्या अंगी आहे. म्हणूच स्वतचे विचार कसे बरोबर आहेत हे सांगण्यासाठी ते खोटंही बोलतात.

webdunia
WD
शुभ दिवस: बुधवार, शुक्रवार हे दिवस अतिशुभ आहेत.

शुभ तारीख: ३,६, ९, १२, १५, १८, २१, २४ या तारखांना महत्त्वाची कामे करावीत.

भाग्यशाली रंग: सफेद, फिकट निळा, गुलाबी, हिरवा आणि चॉकलेटी रंग अतिशय शुभ मानला जातो.

भाग्यशाली वर्ष: ९, १२, १५, १८, २१, २४, २७, ३० ही वर्ष भाग्यशाली आहेत.

webdunia
WD


भाग्यशाली करिअर: शिल्पकला, फॅशन डिझायनर, ज्वेलरी डिझायनर, चित्रपट निर्मिती, अभिनय, साहित्य, हॉटेलिंग, लिखाण

प्रेम, विवाह, मैत्री: या व्यक्तींचे ६आणि ३ मूलांक असलेल्या व्यक्तींशी उत्तम संबंध राहतील.

भाग्योदयासाठी उपाय: शुक्रवारी पांढरी वस्त्रे परीधान करून साखर आणि तांदूळ दान करावेत. यामुळे जीवनातील कष्ट कमी होतील. वाहत्या पाण्यात चांदीचा नाग आणि नागीन सोडून द्यावे. त्यामुळे भीती दूर होईल.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (06.03.2017)