मूलांक २ चा स्वामी चंद्र आहे. कल्पनाशीलतेचा तो कारक आहे आणि कल्पनेशिवाय विकास अशक्य.
स्वरूप: एकूणच नाजूक व्यक्तिमत्त्व असलेल्या या व्यक्ती असतात. शारीरिक स्वरूप आकर्षक आणि मजबूत असते. त्यांचे आरोग्य मात्र मध्यम स्वरूपाचे असते. सतत शारीरिक विकार होत राहतात.
व्यक्तिमत्त्व: मुळातच मनाशी या ग्रहाचा संबंध असल्याने संवेदनशील, भावुक अशी या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करता येइल. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कायमच या व्यक्ती सतर्क असतात. आपली जीवनशैली, खानपान कसं असावं याबाबतीतील समज अत्यंत दृढ असतो. भौतिक गुणांपेक्षा मानसिक गुण अधिक प्रदर्शित होतात. समाजात सहज स्विकार्य असे हे व्यक्तिमत्त्व असते.
स्वभाव: स्वभाव मूडी असतो. एखाद्या समस्येने कासाविस होत असल्याने छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठीही ऊहापोह करतात. थोडक्यात वर्णन करायचं तर चंद्राच्या कलेप्रमाणेच स्वभाव बदलत राहतो. मात्र इतरांविषयी नेहमीच सहृदयी असे हे व्यक्तिमत्त्व असते, त्यात कोणताही दिखाऊपणा नसतो.
गुण: गुण प्रधान, मायेचा पूर्ण आस्वाद घेणारे असतात आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहतात. मनात सतत कुठेतरी अध्यात्माप्रति कोमल भाव आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा बाळगून असतात. उदार स्वभावामुळे यांच्या संपर्कात अपरिचित व्यक्तीही सुखावतो. नियमांशी कधीही तडजोड करत नाहीत आणि शिस्तप्रिय असतात. पोहणे, नृत्य करणे, बागकाम आणि इतर कलात्मक गोष्टींमध्ये विशेष रस असतो.
अवगुण: जीवनात कोणत्याही एका कार्यात संतुष्ट नसतात, वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. हाती घेतलेल्या कामात जराशी अडचण आली तरी ते काम सोडून दुसऱ्या कार्यात लक्ष घालतात. भोळा आणि सरळ स्वभाव अनेक कार्यात बाधा निर्माण करणारा ठरतो. त्यामुळे स्थायी भाव यांच्यात अधिक जाणवतो. उदासीनता हा मुख्य अवगुण आहे.
भाग्यशाली तिथी: 2, 4, 11, 13, 20, 22, 29 व 31 या तारखा या व्यक्तींसाठी भाग्यशाली आहेत. 7, 16 आणि 25 या तारखाही क्वचित शुभफलदायी ठरतील.
भाग्यशाली वर्ष: 4, 13, 22,31, 40, 49, 58, 67, 76 ही वर्षे भाग्यशाली असतील. 25, 34, 43, 52, 61 व 70 ही वर्षे अधिक उत्तम आहेत. 12, 18, 21,27 व 30व्या वर्षी विशेष सावधानता राखावी.
भाग्यशाली करिअर आणि व्यवसाय: ग्लॅमरची विशेष ओढ असल्याने या व्यक्ती तशाच फिल्डमध्ये म्हणजे अभिनय, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात यश संपादन करू शकतात. या व्यतिरिक्त लेखन, संगीत, कला, नृत्य या क्षेत्रात यश मिळू शकते.भाग्यशाली करिअर आणि व्यवसाय: ग्लॅमरची विशेष ओढ असल्याने या व्यक्ती तशाच फिल्डमध्ये म्हणजे अभिनय, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात यश संपादन करू शकतात. या व्यतिरिक्त लेखन, संगीत, कला, नृत्य या क्षेत्रात यश मिळू शकते.
प्रेम आणि मैत्रीसाठी भाग्यशाली अंक: ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यातील 2, 4, 7,11, 13, 16, 20, 22, 25, 29 आणि 31या तारखांना झाला आहे, त्त्या व्यक्ती मूलांक 2 साठी भाग्यशाली आहेत. मैत्री, प्रेम आणि विवाहासाठी या व्यक्ती 2 मूलांकासाठी योग्य आहेत. मात्र 3, 9, 12, आणि 27 तारखेस जन्मलेल्या व्यक्ती मैत्री, प्रेम, सामंजस्य आणि विवाहासाठी योग्य नाहीत.
भाग्यशाली रंग: क्रिम, पिवळा आणि गुलाबी रंग या मूलांकासाठी शुभ रंग आहे. लाल, पांढरा आणि गडद हिरवा या व्यक्तींसाठी भाग्यशाली रंग आहेत. काळा, वांगी कलर या रंगांपासून दूर राहा. हे रंग समस्या निर्माण करू शकतात.
शुभ रत्न: मूलांक 2 च्या व्यक्तींनी मोती रत्न धारण करावे. किंवा चांदीचा चंद्र गळ्यात धारण केल्यास विशेष लाभ होईल.
कल्याणकारी मंत्र: या व्यक्तिंनी कल्याण आणि प्रगतीसाठी चंद्रमंत्रासोबत गणपती मंत्राचाही जप करावा.
मंत्र- ॐ सौं सोमाय नम:।
ऊं वक्रतुण्डाय हुम्।।