Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केवळ या 10 उपायांनी शनी दोष दूर करा

केवळ या 10 उपायांनी शनी दोष दूर करा
, शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (23:10 IST)
लोकं शनीला घाबरतात परंतू शनी भाग्यविधाता आहे आहे योग्य रित्या आणि सोप्या नियमाने पालन केले तर आपल्यावर शनीची कृपा दृष्टी राहील.
 
आज आम्ही आपल्या या बद्दल काही सोपे उपाय सांगत आहोत ज्यातून केवळ एक उपाय देखील आपण मनोभावे केला तर फायदा दिसून येईल. सर्व संकट दूर होतील आणि शनीची कृपा राहील. 
 
शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी देवाला तेल अर्पित करायचे आहे. याने साडेसाती असो वा ढैय्या, पितृदोष असो व इतर काही संकट सर्वांपासून मुक्ती मिळेल. 
 
तसेच पितृदोष दूर करण्यासाठी ही सोनेरी संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. या दिवशी शनीची पूजा केल्याने पितर दोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी ब्राह्मणाला दान द्यावे.
 
शनिवारी घराची, दुकानाची किंवा जिथे कुठे आपण वावरत असाल त्या स्थानाची स्वच्छता केली पाहिजे. यासोबतच मानसिक पवित्रता देखील महत्त्वाची आहे. शक्य असल्यास या दिवशी एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे तसे शक्य नसल्यास घरातच अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ किंवा बडीशेप घालून त्या पाण्याने अंघोळ करावी. अंघोळीनंतर घराच्या मुख्य दराजवळ दिवा लावावा.
 
शनिवारी घरातील झाडू बदलावी. जुनी झाडू फेकून नवीन झाडू वापराला काढावी.
 
नंतर शनी मंदिरात जाऊन शनी देवाला तेल, निळे फुलं, काळे तीळ, काळे उडीद अर्पित करावे. या तून जितकं शक्य असेल तेवढे अर्पित करावे. 
मंदिर किंवा घरी शनी मंत्र जपावे. आपण शनी मंत्र, शनी चालीसा, शनी नवाक्षरी मंत्र यातून कोणतेही मंत्र आपल्या सुविधानुसार जपू शकता.
 
ज्यांना साडे साती किंवा ढैय्याचा त्रास असेल त्यांनी यथाविधि पूजा करावी. अशात घरात शनीची मूर्ती तर ठेवत नाही म्हणून ईशान कोण कडे मुख करून बसावे. समोर काळा किंवा लाल कपड्यावर हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. हनुमानाची दृष्टी दक्षिण दिशेकडे असावी याची काळजी घ्यावी. विधिवत पूजा करून धूप-दीप दाखवावे. तसेच काळे तीळ, निळे फुल अर्पित करावे. लाल चंदन माळने शं शनैश्चराय कर्मकृते नम: मंत्र जपावे. उडीद डाळची खिचडी याचे नैवेद्य दाखवावे. परंतू हे नैवेद्य प्रसाद म्हणून स्वत: भक्षण करू नये. हा प्रसाद आपल्याला गरजू किंवा भिकारी किंवा काळी गायीला खाऊ घालायचा आहे हे लक्षात घ्यावे.
 
ही पूजा आपल्याला संध्याकाळी दिवा लावत असलेल्या काळात केली पाहिजे. सव्वा सहा ते सव्वा सात सुमारास ही पूजा करावी ज्याने फल प्राप्ती होते. 
 
तसेच शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. आपण पिंपळाच्या झाडाला काळ्या दोर्‍याला तीन गाठी बांधून बांधू शकता ज्याने व्यवसाय नोकरीत येत असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. 
 
तर सर्वात विशेष म्हणजे आपल्या शनी देवाला तेल आणि तीळ दान करायचे आहे. किंवा आपण शनी संबंधी कोणती ही वस्तू दान करू शकता. 
 
आणि आता विशेष म्हणजे शनिवारी मास मदिरा तामसिक भोजनाचे सेवन करू नये. शारीरिक संबंध बनवू नये. दारावर आलेल्या गरीब गरजू लोकांना दुत्कारु नये अर्थात त्यांच्यासोबत वाईट वागू नये. स्मशान जवळून जाऊ नये. कोणाचाही अपमान करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (13.08.2021)