Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शनि ग्रह शांती, मंत्र व उपाय

शनि ग्रह शांती, मंत्र व उपाय
, शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (14:51 IST)
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला क्रूर ग्रह म्हटले आहे, परंतु शनी हा शत्रू नसून मित्र आहे. शनिदेव हे कलियुगाचे न्यायाधीश आहेत आणि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनि ग्रहाच्या शांतीसाठी अनेक उपाय आहेत. यामध्ये शनिवारचे व्रत, हनुमानजींची पूजा, शनि मंत्र, शनि यंत्र, सावली दान हे प्रमुख उपाय आहेत. शनि हा कर्म भावाचा स्वामी आहे, त्यामुळे शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होते. याउलट कुंडलीत शनि अशक्त झाल्यामुळे व्यवसायात अडचणी, नोकरीत नुकसान, नको असलेल्या ठिकाणी बदली, पदोन्नती आणि कर्जामध्ये अडथळे येतात. जर तुम्ही अशा प्रकारच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही शनिग्रह शांतीचे उपाय अवश्य करा. कारण ही कामे केल्याने शनिदेवाकडून शुभ परिणाम प्राप्त होतील आणि अशुभ प्रभाव संपुष्टात येतील.
 
पोशाख आणि जीवनशैलीशी संबंधित शनी ग्रहाच्या शांतीसाठी उपाय
शनी ग्रहाच्या शांतीसाठी उपाय
काळ्या रंगाचे वस्त्र वापरावे.
मामा आणि वयस्कर लोकांचा सन्मान करावा.
कर्मचार्‍यांना तसेच नोकरांना नेहमी खुश ठेवावे.
दारु आणि मासाहाराचे सेवन टाळावे.
रात्री दूध पिणे टळावे.
शनिवारी रबर, लोखंड निगडित वस्तू खरेदी करणे टाळावे.
 
विशेषतः सकळी केले जाणारे शनी ग्रहाचे उपाय
शनी देवाची पूजा करा.
श्री राधे-कृष्णाची आराधना करा.
हनुमानाची पूजा करा.
कूर्म देवाची पूजा करा.
 
शनिदेवासाठी व्रत
दंडाधिकारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी उपवास करुन शनिदेवाची विशेष पूजा, शनि प्रदोष व्रत, शनि मंदिरात जाऊन दीप दान करावे.
 
शनी शांतीसाठी दान करा
शनी ग्रहाशी निगडित वस्तंचे दान शनिवारी शनीच्या होरा व शनी ग्रहाच्या नक्षत्र (पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपद) मध्ये दुपारी किंवा संध्याकाळी करावे. दान केल्या जाणार्‍या वस्तू - अख्खे उडिद, लोखंड, तीळ, तेल, तिळाच्या बिया, पुखराज रत्न, काळे कपडे इतर.
 
शनीसाठी रत्न
शनीसाठी नीलम रत्न धारण केलं जातं. हे रत्न मकर आणि कुंभ राशीचे जातक धारण करु शकतात. हे रत्न शनीच्या नकारात्मक प्रभावापासून वाचवतं.
 
शनी यंत्र
जीवनात शांती, कार्य सिद्धी आणि समृद्धीसाठी शुभ शनी यंत्राची पूजा करावी. शनि यंत्र शनिवारी शनीच्या होरा व शनीच्या नक्षत्रात धारण करावं.
 
शनीसाठी जडी
शनी शांतीसाठी बिच्छू जड किंवा धतूर्‍याचं मूळ शनिवारी शनी होरा किंवा शनी नक्षत्रात्र धारण करावं.
 
शनीसाठी रुद्राक्ष
शनीसाठी 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे फलदायी आहे.
सात मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र:
ॐ हूं नमः।
ॐ ह्रां क्रीं ह्रीं सौं।।
 
शनि मंत्र
शनि दोष निवारणसाठी शनि बीज मंत्र जपावं. 
मंत्र - ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः!
23000 वेळा शनी मंत्र जपावं. परंतु देश-काळ-पात्र सिद्धांत अनुसार कलयुगात हे मंत्र 92000 वेळा जपावं.
 
शनी ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हे मंत्र देखील जपू शकता- ॐ शं शनिश्चरायै नमः!
या लेखात सांगितलेले शनि ग्रहाच्या शांतीसाठी केलेले उपाय खूप प्रभावी आहेत. बलवान शनीचे उपाय जर तुम्ही पद्धतशीरपणे केलेत तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. जर तुम्ही शनि बीज मंत्राचा जप केला आणि शनी यंत्राच्या स्थापनेनंतर पूजा केली तर तुम्हाला स्वतःमध्ये एक अद्भुत बदल अनुभवायला मिळेल. तुम्हाला विविध क्षेत्रात यशस्वी परिणाम मिळतील. शनिशांतीच्या युक्त्या शनिदेवाच्या वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करतील.
 
ज्योतिषशास्त्रात शनि हा अशुभ ग्रह मानला जातो. पण त्याचे परिणाम नेहमीच वाईट नसतात. हे जातकाला त्यांच्या कर्माच्या आधारे फळ देतं. मात्र, शनीची हालचाल अतिशय मंद आहे. त्यामुळे जातकांना त्याचे परिणाम उशिरा मिळतात. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शनिदोष उपाय अवश्य करावेत. तुमच्या कुंडलीत शनि उच्च असेल तरीही तुम्ही शनि मंत्राचा जप करू शकता. यामुळे शनिदेवाचे शुभ परिणाम वाढतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्योतिष शास्त्राप्रमाणे सरकारी नोकरी मिळवण्याचे उपाय