शनीदेवाची कृपा असावी अशी सर्वांची इच्छा असते कारण शनी महाराज नाराज झाल्यावर त्यांचा प्रकोप झेलणे कठिणं जातं म्हणून लोकं शनिदेवाची पूजा करतात व त्याची चांगली दृष्टी असावी अशी प्रार्थना करतात. अशात आपल्या सवयींबद्दल बोलायला गेलो तर अशा मनुष्यात अशा दहा सवयी असतात ज्या शनिदेवाला अजिबात पसंत नाही म्हणून या टाळण्याचा प्रयत्न करा व देवाची कृपा मिळवा.
1. शनी देवाला जुगार खेळणारे लोक आवडत नाहीत.
2. शनी देवाला दारु पिणारे लोकं आवडत नाहीत.
3. व्याजाचा व्यवसाय करणारे लोक शनिदेवाला पसंत पडत नाही.
4. जे लोक परस्त्रीसोबत संबंध ठेवतात किंवा अनैतिकरित्या सहवास करतात असे लोक शनिदेवाला आवडत नाही.
5. कोणाविरूद्ध खोटी साक्ष देणे किंवा एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याविरूद्ध कोणतीही कृती करणे शनिदेवला आवडत नाही.
6. निरपराधी माणसे, प्राणी किंवा पक्ष्यांना यातना देणारे, म्हशीला मारणारे, साप, कुत्री, कावळे यांना त्रास देणार्या लोकांना शनिदेव पसंत करत नाहीत.
7. आई-वडील, वडीलधारी माणसं, सेवक व गुरुंचा अपमान करणे, विधवा, घटस्फोट झालेले, सफाई कामगार कर्मी आणि अपंगांचा अपमान करणे देखील शनिदेवाला पसंत नाही.
8. देव विरुद्ध असणे किंवा नास्तिक होऊन लोकांना भ्रमित करणे, धर्माची चेष्टा करणे, देवतांचा अपमान करणे हे शनिदेवाला आवडत नाही.
9. दात स्वच्छ न ठेवणे, वेळेवर स्नान न करणे, वारंवार शिव्या घालणे हा व्यवहार देखील शनिदेवाला आवडत नाहीत.
10. तळघरातील बंदिस्त हवा मुक्त करणे, ज्ञानाचा अभिमान असणे, लोकांना नीच समजणे, अस्पृश्यता, भेदभाव करणे हे देखील शनिदेवाला आवडत नाही.
वरीलपैकी एखादी सवय तुमच्यात असल्यास ती लवकर सोडा आणि शनिदेवांकडे क्षमा मागा.