Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shani Pradosh Vrat 2021: शनी प्रदोषच्या दिवशी आज संपूर्ण दिवस पंचक, या मुहूर्तामध्ये पूजा करू नका

Shani Pradosh Vrat 2021: शनी प्रदोषच्या दिवशी आज संपूर्ण दिवस पंचक, या मुहूर्तामध्ये पूजा करू नका
, शनिवार, 8 मे 2021 (09:14 IST)
सनातन धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. मेचा पहिला प्रदोष व्रत शनिवार, 08 मे 2021 रोजी साजरा केला जाईल. शनिवारी प्रदोष व्रत असल्यामुळे त्याला शनी प्रदोष व्रत म्हणतात. शनिप्रदोष व्रत करताना महादेवासोबत शनिदेवचीही पूजा केली जाते. या दिवशी चंद्र मीन राशीत संक्रमित होईल तसेच सूर्य मेष राशीत संचार करेल.
 
ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, प्रीती योगामध्ये वाढती सुसंवाद, प्रेम विवाह आणि मित्र व नातेवाइकांना समजवण्यात यश मिळते. याखेरीज हा योग भांडणे मिटविण्यासाठी किंवा तडजोडीसाठीसुद्धा शुभ मानला जातो. या योगामध्ये केलेले कार्यात सन्मानाची प्राप्ती होते.  
 
त्रयोदशी केव्हापासून केव्हापर्यंत आहे?
 
त्रयोदशी तिथी 08 मे 2021 सायंकाळी 05:20 मिनिटाने सुरू होईल आणि त्रयोदशी तिथी समाप्त - 09 मे 2021 सायंकाळी  07. 30 वाजता समाप्त होईल.
 
शनी प्रदोषच्या दिवशी या मुहूर्तामध्ये पूजा करावी.
ब्रह्मा मुहूर्ता - 04:00 AM, 08 मे ते 04:43 AM पर्यंत.
अभिजित मुहूर्ता - 11:39 AM  ते 12:32 PM 
विजय मुहूर्ता - दुपारी 02:18 ते दुपारी 03:11 पर्यंत.
गोधूलि मुहूर्त - 06:31 PM  ते 06:55 PM पर्यंत.
 
शनी प्रदोषच्या दिवशी या मुहूर्तांवर पूजा करू नये.
राहुकाल-  10:26 AM ते 12:05 PM 
यमागंड - 03:25 दुपारी ते 05:04 वाजेपर्यंत 
गुलिक कालावधी- 07:06 AM  08:46 AM
दुर्मुहूर्त- - 08:06 AM ते 08:59 AM.
पंचक – संपूर्ण दिवस

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तूमध्ये हंसाच्या चित्राचे काय महत्त्व आहे, ते येथे जाणून घ्या