Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ष 2021 मध्ये कोणत्या राशीवर राहणार साडेसाती आणि ढैय्या, उपाय जाणून घ्या

वर्ष 2021 मध्ये कोणत्या राशीवर राहणार साडेसाती आणि ढैय्या, उपाय जाणून घ्या
, गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (09:11 IST)
ज्योतिष शास्त्रात शनीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नवग्रहात शनीहे न्यायाधीश मानले आहे. ज्योतिष शास्त्रात शनीची स्थिती एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 
 
तसेच त्यांचे एक महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचे परीक्षण करून त्याच्या भविष्या बद्दल सूचित करण्यासाठी जन्मपत्रिकेत शनीच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. शनी हा स्वभावाने एक निर्दयी आणि पृथकवादी ग्रह आहे. जेव्हा हे जन्मपत्रिकेत एखाद्या अशुभ घराचा स्वामी बनून शुभ घरात राहतात तेव्हा हे माणसाच्या अशुभ फळामध्ये वाढ करतो. हा एक हळू चालणारा ग्रह आहे. शनी एका राशीत अडीच वर्ष राहतात. ज्योतिषानुसार शनी हे दुःखाचे स्वामी आहे. शनी शुभ असेल तर माणूस सुखी आणि शनी अशुभ असतो तर मनुष्य दुखी आणि काळजीने वेढलेला असतो. 
 
शुभ शनी आपल्या साडेसाती आणि ढैय्या मध्ये माणसाला लाभ मिळवून देतात आणि अशुभ शनी आपल्या साडेसाती आणि ढैय्या मध्ये माणसाला खूपच असहनीय वेदना देतात. शनी ज्या राशीमध्ये असतात त्याच्या सह त्याराशी पासून दुसरी आणि बारावी राशी वर साडेसातीचा प्रभाव पडतो. तसेच शनी ज्या राशींमध्ये चवथे आणि आठव्या राशीमध्ये असतात त्या राशींना शनीच्या ढैय्या असणाऱ्या राशी मानतात. चला तर मग जाणून घेऊ या की या वर्षी  2021 मध्ये कोणत्या राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आहे आणि कोणावर ढैय्याचा प्रभाव राहील.
 
* वर्ष 2021 मध्ये धनू, मकर, आणि कुंभ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आहे.    
* वर्ष 2021 मिथुन आणि तूळ राशीचे लोक शनीच्या ढैय्याने प्रभावित होणार आहे.
 
शनीच्या अशुभ प्रभावाला कमी करण्यासाठीचे काही उपाय -
1 दर शनिवारी आपली सावली दान करावी (लोखंडाच्या वाटीत तेल भरून त्यामध्ये आपला चेहरा बघून वाटी सकट तेल दान करावे)
2 सात शनिवार 7 बदाम शनी मंदिरात अर्पण करा.
3 शनिवारी एखाद्या अन्न छत्रात कोळसा दान करा.
4 दर शनिवारी सव्वा किलो काळे हरभरे, सव्वा किलो काळे उडीद, काळी मिरी, कोळसा, चामडं, लोखंड, काळ्या कपड्यात गुंडाळून दान करावं.  
5 दर शनिवारी मुंग्यांना साखर घातलेले गव्हाचे पीठ टाका.
6 दररोज पिंपळाला पाणी घाला.
7 दररोज अंघोळीच्या पाण्यात बडी शोप, खस, काजळ आणि काळे तीळ घालून त्या पाण्याने अंघोळ करा.
8 दर रोज ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनये नम:चा जप करावा.
9 दररोज दशरथकृत शनी स्तोत्राचे वाचन करावे.
10 साडेसाती आणि ढैय्याच्या काळात काळे आणि निळे रंगाचे कपडे घालू नका.
11 दर पक्षाच्या पहिल्या शनिवारी काळे किंवा निळे ब्लँकेट गरजुंना दान करावे.   
 
-ज्योतिर्विद् पं. हेमन्त रिछारिया
प्रारब्ध ज्योतिष परामर्श केन्द्र
सम्पर्क: [email protected]

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्योतिष 2021 : नवीन वर्षातील 12 रासंसाठी सोपे आणि अचूक उपाय