Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 10 गोष्टी लपवू नका, नाही तर येऊ शकतं संकट

या 10 गोष्टी लपवू नका, नाही तर येऊ शकतं संकट
अनेक गोष्टी अश्या असतात ज्या गुपित ठेवल्या पाहिजे परंतू काही गोष्टी असतात ज्या सर्वांसमोर सांगणे अधिक योग्य ठरतं. अनेक लोकं अश्या गोष्टी लपवतात ज्या खरं तर सगळ्यांना सांगायला हव्या. शास्त्रांप्रमाणे येथे अश्या 10 गोष्टी सांगत आहोत ज्या लपवल्याने आपण संकटात पडू शकतात.
 
1) मुलगी किंवा मुलाच्या लग्नाबाबत
आपण मुलगी किंवा मुलाचं लग्न ठरवू पाहत असाल तर हे लपवून ठेवू नये. आपल्या मित्र-नातेवाइकांना स्पष्ट सांगा की अमुक स्थळाबद्दल विचार करत आहोत किंवा लग्न ठरले आहे. याने काही अमंगळ टळू शकतं.
 
2) अध्ययन आणि पात्रता
आपलं शिक्षण आणि आपण काय करण्याची पात्रता ठेवता ही गोष्ट गुपित ठेवण्यासारखी नाही. हे सांगितल्याने लोकांना आपली योग्यता कळेल आणि त्यांचा आपल्यावर विश्वास बसेल. आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
 
3) दान-पुण्य
दान-पुण्याबद्दल कोणालाही सांगू नाही असे ऐकले होते परंतू यांना सांगण्याचे दोन कारण आहे- प्रथम तर आपल्या या कार्यामुळे इतर लोकांना प्रेरणा मिळेल आणि दुसरं कारण आपले दान चोरीचे नाही हे कळेल.
 
4) देणे-घेणे
'मी या बँकेतून लोन घेणार' किंवा 'मला या व्यक्तीचे इतकं ऋण भरायचे आहे' ही गोष्ट काही लोकांना सांगितल्याने आपल्याला लाभ मिळेल आणि लोकांचा आपल्यावर विश्वास वाढेल. कोणालाही कर्ज दिलं असेल ते ही सांगितले पाहिजे.
 
5) खरेदी-विक्री
आपण एखादी वस्तू विकायला जात असाल तर ही गोष्ट सांगायला पाहिजे. शक्य आहे की अजून कुणाला त्या वस्तूची अत्यंत गरज असेल आणि तो यासाठी जास्त किंमत मोजायला तयार असेल. तसेच एखादी वस्तू खरेदी करत असाल आणि ती चोरीची असेल किंवा त्यात खोट असेल तरी उघडकीस येईल. अशा प्रकारे नुकसान होण्यापासून वाचता येईल.  
 
6) आपले शुभ कर्म आणि यश
आपण केलेले चांगले काम आणि आपल्या जीवनात मिळवलेले यश खूप गाजवावे असे नाही परंतू योग्य वेळी लोकांसमोर मांडावे. याने आपली प्रतिष्ठा वाढेल तसेच लोकांशी चांगले संबंध तयार होतील.  
 
7) एखाद्या प्रती कृतज्ञता
जर आपल्याला एखाद्याचे आभार व्यक्त करायचे असतील किंवा आपण कृतज्ञ आहात तर समोरच्या व्यक्तीला जाणीव करून द्या. आपण सर्वांसमोर आभार मानले तर समोरच्याचा आपल्याप्रती सन्मान आणि विश्वास वाढेल.
 
8) प्रेम व्यक्त करणे
कोणाप्रती सन्मान आणि प्रेमाची भावना असल्यास ते व्यक्त करणे चुकीचे नाही. साथीदार, आई-वडील, भाऊ-बहीण, मुलं, मित्र यांच्याशी प्रेम करणे व प्रकट करणे सर्वात सुखाचे क्षण असतात. प्रेम व्यक्त केल्याने नात्यात मजबुती येते.
 
9) आजाराबद्दल
कुटुंब आणि डॉक्टरांसमक्ष आपण आजार लपवत असाल तर हे नुकसान करेल. आजारावर उपचार आणि काळजीशिवाय मात करणे अवघड जाईल. अनेकदा आजारी चुकीच्या डॉक्टराकडून उपचार घेत असतात अशात परिचित व्यक्तीचा सल्ला मिळाल्यास योग्य उपचार मिळू शकतो.
 
10) ज्ञान
आपल्याकडे असं ज्ञान असेल ज्याने एखाद्याच्या जीवनात लाभ मिळू शकत असेल तर ज्ञान लपवणे चुकीचं ठरेल. ज्ञानाचा अधिक विस्तार लाभदायक ठरतो. ज्ञान उचित व्यक्ती आणि जागी शेअर करणे गरजेचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...