शुक्र ग्रहाला नेहमी सौंदर्य, भाग्य आणि प्रेमाचा कारक मानला जातो. कुठल्याही ग्रह नक्षत्राच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडतो. शुक्र वर्तमानात उच्च राशी मीनमध्ये विराजमान आहे. तर जाणून घेऊ कोणत्या राशीवर त्याचे काय प्रभाव पडेल...
मेष – मेष राशीचे स्वामी मंगळ आहे जो शुक्रासोबत सम मानले जाते. शुक्राचे वक्री असल्याने याचा सम प्रभाव बघायला मिळेल. धन प्राप्तीचे योग बनतील पण शुक्राच्या प्रभावामुळे मिळकतीपेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. पण हा खर्च व्यर्थ जाणार नाही कारण घरात शुभ प्रसंगाचे आयोजन होण्याची शक्यता दिसून येत आहे. मान सन्मानात वाढ होईल पण मन बेचैन राहील.
वृषभ – जर व्यक्तीगत जीवनाच्या दृष्टीने बघितले तर राशी स्वामी शुक्राचे वक्री होणे सकारात्मक आहे. आपल्या जोडीदारासोबत प्रेमळ संबंध राहतील पण जर अविवाहित असतील आणि कोणासोबत प्रेम संबंध असतील तर त्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिथुन: मिथुन जातकांसाठी वक्री शुक्र चांगले योग आणणार आहे. कार्यांची गती हळू राहणार आहे. स्वंत:चे घर बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. वाहन खरेदीसाठी वेळ चांगला आहे. पण वक्री शुक्र असल्यामुळे कार्य पूर्ण होणे अवघड आहे.
कर्क: वक्री शुक्र भाग्यात वाढ करवून देईल. तुमच्या चारीकडे आनंदी वातावरण राहील. दांपत्य जीवनात शुभ योग दिसून येत आहे. परिणय सूत्रात अडकू शकता. प्रेम संबंधांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होईल.
सिंह: मीन राशीत वक्री झालेल्या शुक्राचे संकेत आहे की शुक्राचे वक्री राहणे अर्थात 15 एप्रिलपर्यंत जोडीदाराच्या आरोग्याची काळजी राहणार आहे. अविवाहित प्रेमी जोडप्यांमध्ये आपसातील प्रेम कमी होण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळावे. तरी देखील यात्रा करावी लागली तर आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या: शुक्राचे वक्री झाल्यामुळे कन्या जातकांसाठी वेळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत प्रेम वाढण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवन मधुर राहील. आर्थिक रूपेण धन प्राप्तीचे योग आहे.
तूळ – राशी स्वामी वक्री असल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. शत्रूंपासून सावध राहा. नवीन वाहन किंवा स्वत:चे घर खरेदी करण्याचे योग येत आहे. त्यासाठी कर्ज घ्यावे लागतील.
वृश्चिक – वक्री शुक्र असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. संतानच्या शिक्षेवर धन खर्च करावे लागेल. हळू हळू वेळ अनुकूल होईल.
धनू – शुक्राचे वक्री असल्याने काही खास इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यक्तीगत जीवनात प्रेम वाढेल. अविवाहित जातक देखील कोणाप्रती आकर्षित होतील. परिवारात एखादे शुभ प्रसंग होण्याची शक्यता आहे.
मकर – मकर जातकांना वक्री शुक्र सचेत राहण्याचे संकेत देत आहे. कुठलेही कार्य करण्याअगोदर त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे विचार करून घ्या. शत्रू देखील परेशान करू शकतात. ध्येय प्राप्तीसाठी फार मेहनत करावी लागणार आहे. पण मेहनतीचे फळ चांगले मिळतील. यश देखील मिळेल.
कुंभ – कुंभ जातकांसाठी वक्री शुक्र अनुकूल राहणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल मानसिक तणाव थोडे कमी होतील. नवीन कार्य सुरू करण्याची योजना देखील बनू शकते. तसेच जे लोक प्रेमात पडले आहे त्यांचे संबंध सुधारतील.
मीन – वक्री शुक्र उत्साह वाढवेल. भाग्याच्या भरवशावर बसून राहणे योग्य नाही आहे. प्रवासासाठी वेळ उत्तम आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. आपसातील संबंधांबद्दल स्थिती थोडी तणाव देणारी ठरणार आहे. आपल्या जोडीदाराप्रती निष्ठावंत राहा.