हिन्दू मुस्लिम तंत्र, मंत्र म्हणत गाठ घातलेला दोरा गळ्यात किंवा हाताला बांधतात त्याला गंडा म्हणतात जेव्हाकि कागद, ताडपत्र किंवा भोजपत्रावर मंत्र लिहून एखाद्या पितळ, लोखंडी, चांदी किंवा तांब्याच्या अर्धा इंची पेटीत बंंद करुन त्याला गळ्यात किंवा बाजूवर बांधणार्या वस्तूला तावीज म्हणतात. आता प्रश्न असा आहे की गंडे तावीज घालणे कितपत योग्य आहे-
मारण, उच्चाटन, वशीकरण, भूत-प्रेत बाधा मुक्ती किंवा धर्मान्तरण इतर हेतू गंडे किंवा ताबीजचा उपयोग जोरदारपणे केला जातो. त्रासलेलं लोक सहज यात फसून जातात.
1. अप्रामाणिक प्रकारे किंवा एखाद्या अपवित्र ओझा, तांत्रिक, फकीर, मौलवी किंवा रस्त्याच्या कड्यावर बसलेल्या लोकांकडून तावीज किंवा गंडा घेऊन घातल्याने नुकसान झेलावं लागू शकतं.
2. हे धारण करुन नशा करणारे किंवा अपवित्र जागी जाणार्या लोकांचे जीवन वेदनादायक होते.
3. लाल किताब ग्रहांच्या विशेष स्थितीनुसार जातकाला एखाद्या संत किंवा साधुकडून तावीज घेण्याची मनाई आहे.
4. बाजू कुंडलीचं पराक्रम भाव असतं म्हणून येथे कोणतीही वस्तू धारण करु नये. कोणत्या धातूची वस्तू धारण केली जात आहे यावर विचार करणे आवश्यक असतं. येथे गंडा बांधल्याने कुंडलीचा पराक्रम भाव दूषित होतो.
5. त्याच प्रकारे आपला गळा कुंडलीचा लग्न स्थान असतो. गळ्यात तावीज किंवा लॉकेट घालावे अथवा नाही हे विचार करण्यासारखे आहे. गळा आमचा लग्न स्थान असल्याने येथे तावीज घातल्याने आमचं हृदय आणि फुफ्फुसे प्रभावित होतात. म्हणून तावीज विचारपूर्वक धारण करावे. याने नुकसान झाल्यास कुंडलीचा लग्न भाव दूषित होऊ शकतो.
6. लाल किताबानुसार जर आपल्या कुंडलीत बुध 9व्या किंवा 11व्या स्थानावर स्थित आहे तर कोणत्याही साधु, संत, फकीर इतरांकडून गंडा किंवा तावीज घेऊ नाही अन्यथा जातकाला त्रास भोगावा लागू शकतो. या व्यतिरिक्त जातकाला पन्ना देखील धारण करणे योग्य नाही आणि हिरव्या रंगाचा वापर देखील करु नये.