Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो

सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो

वेबदुनिया

तुम्ही रूबाबदार व्यक्तिमत्वाचे आणि राजा सारखे अधिकार गाजविणारे असता. जरी तुम्ही परीणामाचा विचार न करता समोरच्याला बोलून जात असले, तरी जबाबदारीची जाणीव ही तितकीच ठेवतात.

कट्टर राहूनही काम पूर्णत्वास नेण्याचे कौशल्य अंगी असते. हुकुमाने इतरांकडून काम करुन घेण्याची तुम्हाला सवय आहे. कर्क राशीसारखे भावनेवरती भर न देता कर्तव्यासाठी कठोर वागतात.

webdunia
WD
तुम्ही आपल्या तत्वांशी ठाम असतात. तत्व सोडत नाहीत, स्पष्टवक्तेपणा आणि कोणत्याही घटनेच्या संघर्षाच्या प्रसंगी तुम्ही दोन्ही बाजूंचा समतोल विचार करतात. तुम्ही राशी स्वभावाप्रमाणे रागीट असला तरी तुमचा राग म्हणजे ओढयाच्या पुरासारखा असतो, जितक्या झटकन येतो तितक्याच झटकन ओसरुन ही जातो.

तुमच्यातील अहंकारी स्वभाव आणि स्पष्ट बोलण्याने तुमच्या सानिध्यातील माणसं तुमच्याकडून दुखावली जातात. तसे तुम्ही मनाने दिलदारही आहात, एखाद्याला सढळ हाताने मदत करण्याची वृत्ती ही असते.

webdunia
WD
तुम्ही मानला तर देव नाही तर दगड, असे टोकाचे अस्तिक किंवा नास्तीक असता. म्हणजे कस एक तरी दोन्ही वेळची आरती न चुकवणारे नायतर कळस बघितला तरी नजर फिरविणारे.

तुम्ही राग अहंकार, फटकळ पणा सोडून द्यावा. माणसाने पथ्य पाळले तर आरोग्य आयुष्य आबादित आणि राशीतले तथ्य कळले कि भविष्य आबादित.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (12.01.2016)