Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्य ग्रहण: आपल्या राशीनुसार लाल किताबाचे अचूक उपाय फायदेशीर ठरतील

webdunia
शनिवार, 20 जून 2020 (06:19 IST)
21 जून 2020 रोजी ज्योतिषाच्या दृष्टीने वर्षाचे पहिले खंडग्रास सूर्य ग्रहण होणार आहे. या नंतरचे सूर्य ग्रहण 14 डिसेंबर रोजी होणार आहे. चला आपण जाणून घेऊया की लाल किताबानुसार या दरम्यान कोण कोणते सोपे उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरणार. हे उपाय आपण सूर्यग्रहणाच्या दिवशी देखील आणि दुसऱ्या दिवशी देखील करू शकता.
 
* मेष आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी
1 हनुमान चालीसाचे पठण करावं.
2 डोळ्यांना पांढरा किंवा काळं अंजन लावा.
3 शुद्ध गूळ खा आणि खाऊ घाला.
4 मसुराची डाळ देऊळात देणगी द्या.
5 कडू लिंबाच्या झाडाला पाणी घाला आणि त्याची पूजा करा.
6 भाऊ आणि मित्रांची सलोख्याचे संबंध ठेवा. रागावू नये.
7 गुलाबी किंवा लाल चादरीवर झोपावे. आतड्या आणि दात स्वच्छ ठेवा.
 
* वृषभ आणि तूळ राशीच्या जातकांसाठी
1 चांदीचे नाणं आपल्या जवळ बाळगा.
2 संध्याकाळी तुपाचा दिवा लावा.
3 सात प्रकाराची धान्ये आणि चरी देणगी द्या.
4 कोणालाही अनावश्यक त्रास देऊ नका आणि आश्वासन देत फिरू नका.
5 इच्छा असल्यास पांढरे कापडी देणगी द्या.
6 जेवणाच्या काही भाग गाय, कावळ्या आणि कुत्र्याला द्या.
7 स्वतःला आणि घराला स्वच्छ ठेवा स्वच्छ कपडे घाला.
8 सुवासिक अत्तर किंवा सेंट वापरावं.
 
* मिथुन आणि कन्या राशीच्या जातकांसाठी
1 संपूर्ण हिरवे मूग देणगी स्वरूपात द्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्या.
2 दुर्गा देवीची पूजा करा.
3 मुलगी, बहीण, मेव्हणी आणि आत्याला मान द्या.
4 चामड्याचे जाकीट घालू नका, हिरव्या रंगाचा वापर करू नका.
5 तुळशीची पूजा करा. 
6 दिलेले आश्वासनं पाळा.
 
* कर्क राशीच्या जातकांसाठी 
1 खीर बनवून दुसऱ्याला खाऊ घाला.
2 आईच्या हातूनच भात किंवा दही खाऊनच कोणत्याही यात्रेला सुरुवात करा.
3 वडाच्या झाडाला पाणी घाला, आणि देऊळामध्ये राजमाची बियाणं ठेवा.
4 पाणी किंवा दुधाला स्वच्छ भांडीत घालून उशाशी ठेवून झोपा आणि सकाळी बाभूळच्या झाडाच्या मुळात घाला.
 
* सिंह राशीच्या जातकांसाठी
1 मद्यपान आणि मांसाहार करू नका.
2 कोणाकडूनही विनामूल्य काहीही घेऊ नका.
3 हनुमान चालीसाचे पठण करा.
4 रविवारचा उपवास करा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे.
5 तोंडात गोड घालून वरून पाणी पिऊनच घराच्या बाहेरच पडावं.
 
* धनू आणि मीन राशीच्या जातकांसाठी
1 खोटं बोलू नये. ज्ञानाचा अभिमान करू नये.
2 पिंपळामध्ये पाणी घाला आणि केशराचा टिळा लावा.
3 गीताचे पठण करा किंवा कृष्णाचे नाव घ्या. 
4 घरामध्ये कापूर किंवा धूप लावा.
5 वडील, आजोबा आणि गुरूंचा सन्मान करा आणि देऊळात लाल भोपळा देणगी द्या.
 
* मकर आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी
1 हनुमान चालीसाचे पठण करावं आणि त्यांना चोळा अर्पण करावं.
2 अंध, दिव्यांग, नोकरदारांना आणि सफाई कामगारांना देणगी द्या.
3 भैरव देवाला कच्चे दूध अर्पण करावं.
4 हिरड्या आणि दात स्वच्छ ठेवावे आणि काळ्या मुंग्यांना अन्न घाला.
5 तीळ, उडीद, लोखंड, तेल, काळे कपडे, किंवा बूट देणगी द्या.
6 कावळ्याला दररोज पोळी खाऊ घाला.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

कुंडलीत सूर्य ग्रहण असल्यास करा हे 5 उपाय