Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेष राशी-भरणी नक्षत्रात होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, जाणून घ्या मंदिर बंद आणि उघडण्याची वेळ

मेष राशी-भरणी नक्षत्रात होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, जाणून घ्या मंदिर बंद आणि उघडण्याची वेळ
, मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (09:51 IST)
कार्तिक अमावस्येला सूर्यग्रहण झाल्यानंतर 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला मेष आणि भरणी नक्षत्रात खग्रास चंद्रग्रहण आहे. 04:59 वाजता ग्रहण सुरू होईल आणि 06:20 वाजता हे ग्रहण मोक्ष आहे. तीन प्रहारमध्ये सकाळी 07:59  पासून म्हणजे नऊ तास आधी सुतक सुरू होईल. हिंदू धर्मात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दोन्हीही अशुभ मानले जातात. देव दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. 2022 मध्ये केवळ 15 दिवसांच्या कालावधीत दुसरे ग्रहण होत आहे हा एक विचित्र योगायोग आहे.8 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण हे वर्षातील शेवटचे ग्रहण असेल.
 
शास्त्रानुसार ग्रहणकाळात जेवू नये किंवा झोपू नये. या काळात कोणतीही पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ग्रहणानंतर स्नान करा आणि गंगाजल शिंपडून घर आणि पूजा घरे पवित्र करा. त्यानंतरच अन्न खावे.
 
मंदिर उघडण्याचे आणि बंद होण्याची वेळ :
सुतक काल सकाळी 8.27 वाजता सुरू होईल. ग्रहण सुरू होण्यापूर्वी मंदिरांमध्ये पूजा-अर्चा होईल. सकाळच्या आरतीनंतर रात्री 8.15 वाजेपर्यंत मंदिरांचे दरवाजे बंद राहतील. संध्याकाळी चंद्रग्रहण पूर्ण झाल्यावर सुतक कालावधी संपेल. त्यानंतर सायंकाळी उशिरा मंदिरांची स्वच्छता केली जाईल. देवतांच्या मूर्तींना स्नान घालण्यात येईल. त्यानंतरच मंदिरांचे दरवाजे देव दर्शनासाठी खुले होतील.
 
मंगळवारी चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक सुरू होईल. संध्याकाळी 5.27 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल. जो संध्याकाळी 6.20 वाजता संपेल. अशा प्रकारे चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 7 मिनिटे असेल. मंगळवारी सकाळी जेव्हा सुतक लावले जाते तेव्हा स्त्रिया आपली महत्त्वाची कामे सुतक कालावधीपूर्वी करून ठेवतात. खाद्यपदार्थांवर तुळशीची पानं  घालून ठेवतात ज्यामुळे ते अपवित्र होत नाही, असा समज आहे. परंतु तरीही बहुतेक लोक ग्रहणाच्या सुतक काळात अन्न खाणे टाळतात.

Edited by : Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chandra Grahan 2022 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणावर विनाशकारी षडाष्टक योग, टाळण्यासाठी करा हे खास उपाय