ग्रहण योग प्रामुख्याने दोन प्रकाराचे असतात- सूर्य आणि चंद्र ग्रहण. जर राहू लग्नमध्ये बसला असेल तर सूर्य कुठेही असला तरी त्याला ग्रहण लागणार. दुसरं जर चंद्र पाप ग्रह राहू किंवा केतूसह बसला असेल तर चंद्रग्रहण आणि सूर्यासोबत राहू असल्यास सूर्यग्रहण लागतं.
आपल्या कुंडलीत जर सूर्य ग्रहण योग असेल तर प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण करेल. या योगाचे ज्योतिष आणि लाल किताबानुसार 5 प्रमुख उपाय अमलात आणावे आणि ग्रहणाचे दुष्परिणाम दूर करावे.
सूर्य ग्रहणासाठी उपाय :
1. सहा नारळ आपल्या डोक्यावरून ओवाळून पाण्यात प्रवाहित करावे.
2. आदित्यहृदय स्तोत्राचे नियमित पठण करावे.
3. सूर्याला पाण्याने अर्घ्य द्यावे.
4. एकादशी आणि रविवारचा उपास करावा.
5. गहू, गूळ आणि तांबा दान करावे.