Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

वर्ष 2020 वर राहूचा परिणाम राहील, टाळण्यासाठी हे 10 सोपे उपाय नक्की करून बघा

save
, गुरूवार, 23 जानेवारी 2020 (13:20 IST)
नवीन वर्षात प्रत्येकास आपले लक्ष्य नवीन आशा आणि उत्साहाने पूर्ण करण्याची इच्छा असते. परंतु कदाचित यावर्षी तुमची स्वप्ने पूर्ण करण्यात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. कारण हे वर्ष राहूच्या मालकीचे वर्ष आहे.
 
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून 23 सप्टेंबर 2020 पर्यंत सकाळी 9.20 वाजता राहू मिथुन राशीत विराजमान राहणार आहे. वर्ष 2020 मध्ये राहूचे राशी परिवर्तन एक मोठी ज्योतिष घटना म्हणून बघण्यात येत आहे.
 
राहूच्या या परिवर्तनाचा सर्व राशींवर भिन्न प्रभाव पडेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहू एक क्रूर ग्रह मानला जातो. राहूच्या अशुभ परिणामामुळे लोकांना अनेक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावे लागत आहेत.
 
अशा परिस्थितीत, जर तुमच्या कुंडलीत राहू नीचाचा किंवा कमकुवत असेल तर हे काही सोपे उपाय करून तुम्ही राहूच्या दुष्परिणामांपासून आपले रक्षण करू शकता. चला जाणून घेऊया हा खास उपाय काय आहे.
 
1. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवल्यास चांगले परिणाम मिळतात.
2. कपाळावर चंदन किंवा केशराचा टिळक लावा.   
3. नारळाच्या झाडाला पाणी द्या.
4. हत्तीला भोजन करवा.
5. स्वच्छतागृह, पायर्‍या आणि स्नानगृहाला स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा.
6. डायनिंग रूममध्येच जेवण करावे.
7. मांस आणि अल्कोहोलपासून दूर राहा.
8. भैरू महाराजांना कच्चे दूध किंवा मद्य अर्पण करा.
9. गुरुवारी उपवास ठेवा.
10. रोज हनुमान चालीसा वाचा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्योतिष शास्त्रानुसार पाण्याचे या ग्रहाशी आहे संबंध, वापरण्याचे नियम जाणून घ्या