Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तूळ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो

webdunia
  • facebook
  • twitter
  • whatsapp
share

वेबदुनिया

तुम्ही वेगवेगळे छंद कलांची जोपासना करणारे आहात. देव भोळे भावनाप्रधान मायाळु जीवनावर श्रध्दा असणारे कर्तव्य आणि प्रेम दोन्हींचा समतोल संभाळणारे असे आहात. तुमच्याकडे न्याय निष्ठुरता, निश्चय, आग्रह नाही. उत्कृष्ट बुध्दीचा विकास प्रत्येक गोष्टीमध्ये स्थिर तत्व शोधून काढण्याची ताकत तुमच्याकडे आहे.

तुम्हाला जन्मताच सौंदर्याची आवड असते. तुम्ही खूपच कनवाळू इतरांवरती माया असलेले दयाळू दुसऱ्यांचे अश्रू पुसणारे आहात.

webdunia
WD


जीवनामध्ये कितीही चढ-उतार आले, कितीही विचित्र घटना घडल्या तरीही खचून न जाता तुम्ही वैभव आणि प्रतिष्ठा मिळवताच. बरेचसे लोक संकटातून धाडसाने मार्ग काढतात, पण तुम्ही संकटालाच संधी समजता आणि निर्भयपणे त्यातून मार्ग काढतात.


webdunia
WD
आपल्याला पाहीजे ते मिळवण्यासाठी हवे तेवढे कष्ट प्रयत्न करण्याची तुमची तयारी असते आणि या ना त्या मार्गाने यश निश्चयाने तुम्ही मिळवून दाखवता. पण तुम्ही खुपच संयमी असल्यामुळे यशाने हुरळूनही जात नाही.

तुम्ही अभिमानी गोडबोल्या स्वभावाचे असून तुम्हाला नवनवीन ओळखी करून गप्पा मारायला खूप आवडत. प्रेम, मैत्री, सहानुभुती, योग्य समज, सहकार्य, संयमी, भरपूर कष्टाची तयारी, हेच राशी स्वभावातील गुण तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या प्रचलित...

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

webdunia
दैनिक राशीफल (26.03.2017)