Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फक्त महिलाच का करू शकतात टॅरो कार्ड रीडिंग?

webdunia
शनिवार, 9 मार्च 2019 (15:09 IST)
भविष्य जाणून घेण्यासाठी जन्म पत्रिका, हस्तरेषा आणि न्यूमरोलॉजीची मदत घ्यावी लागते. ज्योतिष्याच्या जगात लपलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ह्या सर्व विद्या असल्या तरी एक विद्या अजून आहे ज्याला टॅरो कार्ड रीडिंग म्हटले जाते. 
 
कार्डास प्रमाणे दिसणार्‍या ह्या टॅरो कार्डवर काही रहस्यमय प्रतिकात्मक चिन्ह बनलेले असतात जे संबंधित व्यक्तीसोबत भविष्यात घडणार्‍या बर्‍याच स्तरापर्यंत अनुमानित करू शकतात. व्यक्तीच्या प्रश्नांच्या बदले कार्ड स्वयं उत्तर देतात, ज्यावर त्यांच्याबरोबर होणारी परिस्थिती निर्भर करते.
 
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भविष्याची सटीक माहिती देणार्‍या या टॅरो कार्ड रीडिंगच्या या विद्येला सर्वात आधी चौदाव्या शताब्दीत इटलीमध्ये मनोरंजनाच्या माध्यमाच्या स्वरूपात वापर करण्यात आला होता. पण लवकरच ही विद्या युरोपच्या बर्‍याच देशांमध्ये पसरली आणि हळू हळू याला फक्त मनोरंजनाचे साधन न मानून   भविष्य जाणून घेण्याची गूढ विद्येच्या स्वरूपात आपलेसे करण्यात आले. 18व्या शताब्दीपर्यंत पोहोचता पोहोचता टोरो कार्ड रीडिंग इंग्लँड व फ्रांसमध्ये देखील फार लोकप्रिय झाली.
 
म्हणून स्त्रिया असतात टॅरो कार्ड रीडर 
 
टॅरो कार्डवर अंक, रंग, संकेत तथा पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश सारखे पाच तत्त्व दर्शवण्यात आले असतात, ज्यांच्या आधारे भविष्याचा अनुमान लावता येतो. तुम्ही बघितलेच असेल की जेथे ज्योतिष्याच्या इतर विद्यांमध्ये पुरुषांचा वर्चस्व असतो तसेच टॅरो कार्ड वाचणार्‍या लोकांमध्ये जास्त करून महिलाच असतात. यामागचे कारण असे आहे की टॅरो कार्ड एक अशी प्रणाली आहे ज्यात गणिताचा बिलकुल वापर होत नाही, फक्त अनुमान लावण्याची क्षमता अचूक असायला पाहिजे. वैज्ञानिकरीत्या देखील हे प्रमाणित झाले आहे की अनुमान लावण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. म्हणून टॅरो कार्ड रीडर महिला असतात.
 
टॅरो कार्ड रीडिंगच्या अंतर्गत डेक (कार्ड्स) मधून उचलण्यात आलेले कार्डवर बनलेले चित्र व संकेतांचे अर्थ काय आहे, ते कोणत्या बाजूला इशारा करतात, तुमच्या भविष्याला कोणत्या दिशेत वळवू शकतात, च्या आधारावर भविष्यावाणी केली जाते. तसेच ते कार्ड प्रश्नकर्तेची वर्तमान वेळ आणि त्याची मानसिक स्थिती देखील दर्शवतात.  
 
टॅरो कार्ड काय आहे 
भविष्याच्या गर्भात काय आहे हे जाणून घेण्याची मानवी उत्सुकता आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. टॅरो ही अशीच एक पद्धत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे याची सूचक माहिती यातून मिळते. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सोपे जाते. सर्वप्रथम मध्ययुगीन कालखंडात युरोपात टॅरोचा वापर सुरू झाला. काहींच्या मते भारतातूनच ही भविष्यकथन पद्धती तेथे गेली. इटलीत तिचा मोठा वापर होत होता. त्यानंतर जगभर तेथूनच या पद्धतीचा प्रसार झाला.
 
टॅरोच्या गठ्ठ्यात ७८ कार्डे असतात. त्यांना मेजर आर्काना व मायनर आर्काना यांच्यात विभागले आहे. आर्काना हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. भविष्याच्या पोटात दडलेली व्यक्तिगत माहिती सांकेतिक भाषेत मांडणे असा या शब्दाचा अर्थ आहे. टॅरो हा अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे.
 
शब्द व अंक यांच्या माध्यमातून टॅरो भविष्य जाणून घेता येते. ही पद्धत जगात खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे आता भविष्याच्या गुहेत टॅरोचा हात धरून कसे जायचे याची माहिती घेऊया.
 
टॅरो भविष्य कसे जाणून घ्यावे  
आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे, त्याची सुरवातीला उजळणी करून घ्या. गोंधळ उडू नये यासाठी तो कागदावर लिहिला तरी चालेल.
यानंतर 'कार्ड निवडा' यावर क्लिक करा. आता एकामागोमाग एक तीन कार्ड निवडा.
पहिले कार्ड प्रश्न विचारताना तुमची मनःस्थिती काय आहे याविषयी माहिती देते.
तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती दुसरे कार्ड देते.
तिसरे कार्ड तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

आपल्या माहीत नसतील कुत्र्याबद्दल या 8 शुभ - अशुभ गोष्टी