Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय प्रभाव टाकतात नावात दोनदा येणारे हे अक्षर!

काय प्रभाव टाकतात नावात दोनदा येणारे हे अक्षर!
प्रत्येक धर्मात नाव ठेवण्याची वेग-वेगळी पद्धत असते. कोणी ज्योतिषाप्रमाणे, तर कोणी पत्रिकेप्रमाणे तर कोणी धर्मग्रंथाप्रमाणे आपल्या मुलांचे नाव ठेवतात. पण नाव ठेवल्यानंतर इंग्रजीत त्यांची स्पेलिंगमध्ये किती अक्षरांचा उपयोग होत आहे याचा मुलाच्या स्वभाव आणि जीवनावर प्रभाव पडतो. एवढंच नव्हे तर स्पेलिंगमध्ये कोणता अक्षर कितीवेळा येत आहे हेही लक्षात घेणे गरजेचं आहे. 
 
असे मानले आहे की नावात एक अक्षर दोनदा आल्याने व्यक्तीच्या स्वभावावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणूनच जाणून घ्या कोणता अक्षर आपल्या जीवनात काय प्रभाव सोडतो:
A,I,J,Q Y: जर आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये A,I,J,Q किंवा Y अक्षर दोनदा येत असेल तर आपण साहसी स्वभावाचे आहात. आपला हा धाडसी स्वभाव आपल्या दैनंदिन कामांमध्येही दिसून येतो. याव्यतिरिक्त आपण दुसर्‍यावर सत्ता गाजवणारे असतात व स्वत:ला उत्तम व्यक्ती मानणारे असतात. आपल्यात पैसा कमावण्याची भरपूर लालसा असते. तरीही आपण लोकांची मदत करायला पुढे मागे बघत नाही.

B, K, R: जर आपल्या नावात B, K आणि R अक्षर दोनदा येत असेल तर आपण भावुक आहात. कोणतीही गोष्ट सरळ आपल्या हृद्याला स्पर्श करते आणि आपल्याला काळजीत टाकते. याव्यतिरिक्त आपल्याला कलात्मक गोष्टींची फार आवड आहे. आपल्याला दुसर्‍यांदा मदत करायलाही आवडतं. एकूण आपण विनम्र स्वभावाचे आहात.

C, G, L, S: हे लोकं काल्पनिक ‍दुनियेत जगतात. म्हणून या श्रेणीत येणारे लोकं अधिकश्या कलाकार असतात. कलाकार नसले तरी कलाची कद्र करणारे, कलात्मकता शोधून घेणारे असतात. पण अनेकदा हे अक्षर त्या व्यक्तीसाठी नकारात्मक सिद्ध होतात. हे अक्षर दोनदा असल्यामुळे व्यक्ती स्वार्थी होतो. अनेकदा अश्या लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो.

D, M, T: जर आपल्या नावात D, M आणि T दोनदा येत असेल तर हे सकारात्मक आहे. असे व्यक्ती कामात कुशल, सामंजस्य, ध्येयपूर्वक काम करणारे असतात. जर ते व्यवसायी असतील तर खूप प्रगती करतात. 

E, H, N, X: हे अक्षर दोनदा असलेल्या नावाचा व्यक्तीला यश मिळविण्यासाठी फार वाट बघावी लागत नाही. असे लोकं सामाजिक आणि कायद्याच्या क्षेत्रात यश प्राप्त करतात. परंतु हे अक्षर अधिक वेळा रिपीट झाल्यास नकारात्मक प्रभाव पडतो.

U, V, W: हे अक्षर आपल्या नावात एकाहून जास्त वेळा वापरले जात असल्यास हे आपल्याला एक जबाबदार व्यक्ती बनवतं. असे व्यक्ती रोमॉटिंग आणि काळजी घेणारे असतात.
 

O, Z: हे अक्षर रिपीट झालेल्या व्यक्तीचा स्वभाव शांत असतो. अश्या लोकांना व्यायाम करणे, ध्यान करणे आवडतं. म्हणूनच असे लोकं गर्दीपासून आणि कौटुंबिक ताणापासूनही दूर राहतात.

P, F: नावात P किंवा F अक्षर दोनदा असलेला व्यक्ती ठाम असतो. कुटुंबासह व्यवसाय स्थळीही सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे असतात हे दोन्ही अक्षर. यांना कौटुंबिक सुख प्राप्त होतो. पण अनेकदा हे उधळपट्टी करतानाही दिसतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (05.02.2017)