Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यशाचे बीजगणित!

-वि‍जय चि‍तळे

यशाचे बीजगणित!
'आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती माझ्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?

'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, मी टाइमपास म्हणून उत्तर दिले.

'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली.

मी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!'

'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.
पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.
webdunia


'शाब्बास', मी म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?'

'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे.

'वाह! क्या बात है!' असे म्हणून मी तिची पाठ थोपटून कौतुक केले.

'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली.

'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का?

अदितीने मान हलवून होकार दिला व माझ्याकडे लक्ष देऊ लागली.

मी तिला समजावले, 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते.

'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते.

''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi