जीवनाचा उद्देश
अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा योग्य नाही. ही गोष्ट केवळ याशी संबंधित लोकांना सांगावी.
वैयक्तिक जीवन
आपल्या वैयक्तिक जीवनात कुठलीही समस्या असली तरी दया मिळवण्यासाठी कुणालाही सांगू नये कारण असे लोकं केवळ इतरांशी गपशप करून आपली समस्या चव्हाट्यावर आणतात आणि शिवाय बदनामीचे काहीच हाती लागत नाही.
चांगुलपणा
आपण इतरांना केलेली मदत, स्वत:च्या चांगुलपणाचे कौतुक स्वत: करू नये. आपण खरोखर मदत करत असला तरी असे केल्याने याने आपली इमेज धुळीत मिळायला वेळ लागणार नाही.
सीक्रेट्स
समोरचा किती जरी विश्वासू असला तरी आपले सीक्रेट्स त्यासोबत शेअर करू नये. निश्चितच समोरचा वेळ पडल्यास आपल्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतो.
संपत्ती
आपण खूप श्रीमंत असला तरी याबद्दल स्वत: चर्चा करायची गरज नाही. आपली संपत्ती, पैसा- अडका, गाड्या, दागिने या गोष्टी स्वत: सांगत बसू नये. वेळोवेळी ते लोकांना आपोआप लक्षात येतं.