Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आव्हानात्मक नोकर्‍यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला!

आव्हानात्मक नोकर्‍यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला!

वेबदुनिया

WD
करिअरच्या दृष्टीने भारतीय महिला अधिक सजग झाल्या आहेत. नोकरी करताना त्या आव्हानांचे डोंगर अतिशय लीलया पेलतात. कामाचा प्रचंड ताण, कामाचे दीर्घ तास, नोकरीसाठी जास्त वेळ करावा लागणारा प्रवास, एका जागी नसलेल्या व भटकंती कराव्या लागणार्‍या नोकर्‍या आदी सर्व समस्या असलेल्या नोकर्‍याही भारतीय महिला सहजपणे करतात, असे एका सर्वेक्षणात आढळले आहे.

पूर्वी महिला कर्मचारी एकाच ठिकाणी बसून कामाला प्राधान्य देत होत्या. आता त्यात बदल होत आहे. नोकरीची गरज म्हणून महिला सातत्याने प्रवास करतात. तसेच 33 टक्के महिला या कामाचा प्रचंड त्रास सहन करतात, असे '‍करिअर बिल्डर डॉट कॉम'या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात आढळले. करिअर करताना आपल्यला कुटुंबाचा मोठा आधार मिळतो, असे 82 टक्के महिलांनी सांगितले, तर 60 टक्क्यांहून अधिक महिलांना त्यांच्या करिअरमध्ये लग्नाचा अडथळा वाटत नसल्याचे सांगितले. अत्यंत तणावाखाली काम करताना महिलांना कुटुंबाचे पाठबळ अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे महिला त्यांचे करिअर चांगल्या प्रकारे करू शकतात. उदा. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक वेळ काम करण्याची गरज असते. महिलाही अधिक जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करीत नाहीत, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. जागतिकीकरण व आधुनिकीकरणाने अनेक उद्योग तयार झाले आहेत. त्यामुळे महिला कर्मचार्‍यांना अधिक संधी मिळत आहेत. अनेक कंपन्या पुरुषांपेक्षा महिलांना अधिख प्राधान्य देताना आढळतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi