Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नशिबात असेल तेच मिळेल

नशिबात असेल तेच मिळेल
, मंगळवार, 8 जुलै 2008 (18:03 IST)
एका गावात सोमिलक नावाचा कष्टाळू कोष्टी होता. तो तलम कापड विणण्यात पटाईत होता. पण कष्ट भरपूर करूनसुद्धा अपेक्षित मोबदला त्याच्या हाती येत नव्हता. त्याच्या बरोबरचे इतर कोष्टी जाडंभरडं कापड विणूनसुद्धा भरपूर पैसा कमवित होते.

सोमिलकाने दुसर्‍या गावी जाऊन धंदा करण्याचे ठरविले. पण सोमिलकाची बायको त्याला म्हणाली, ''कशाला उगाच दुसर्‍या गावात जाता.... आपल्या नशिबात भरपूर पैसा मिळणार असेल तर याच ठिकाणी कापड विणून मिळेल. पण नशिबात जर नसेल तर दुसर्‍या गावी जाऊनही उपयोग काय?'' तरी हट्टाने सोमिलक दुसर्‍या गावी जातो. भरपूर कष्ट करतो आणि तिनशे मोहरा कमावतो.

त्या मोहरा घेऊन आपल्या गावी येण्यास निघतो. दमल्यामुळे एका झाडाखाली विश्रांती घेता घेता त्याला झोप लागते. थोड्यावेळाने दोन माणसांच्या संभाषणाच्या आवाजामुळे झोप उडते. त्या दोघांचे संभाषण सोमिलक ऐकतो.

''अरे, कर्त्या... सोमिलकाने आता तीनशे मोहरा कमावल्या पण त्याच्या नशिबात फक्त अन्नवस्त्रापुरताच पैसा आहे'' कर्म विचारतो. त्याबरोबर कर्ता उद्गारतो, ''त्याने कष्ट केले त्याचे फळ मी दिले. ते फळ त्याच्याकडे ठेवायचे की नाही हे तुझं काम!''

दे घोघेजण सोमिलकाचे कर्म आणि कर्ता असतात. सोमिलक पूर्ण जागा होऊन आपली मोहरांची पिशवी बघतो तर ती रिकामी असमे!

Share this Story:

Follow Webdunia marathi