Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँटीबायोटिक्स करू शकतात मुलांच्या विकासावर परिणाम

अँटीबायोटिक्स करू शकतात मुलांच्या विकासावर परिणाम
, बुधवार, 15 जुलै 2015 (12:49 IST)
बर्‍याचदा साध्या सर्दी-खोकल्यावरही मुलांना अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकांचा डोस दिला जातो. मात्र त्यांच्या अतिवापरामुळे मुलांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. सतत अअँटीबायोटिक्स दिल्यामुळे हळूहळू जीवाणूही त्यांना दाद देत नाही. शिवाय सततच्या वापरामुळे वजन वाढणे किंवा हाडांची अतिरिक्त वाढ होणे असे परिणाम दिसू शकतात. उंदरांवरील एका प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलांसाठी वापरले जाणारे अँटीबायोटिक्स उंदराच्या माद्यांना दिली असता त्यांच्या वजनात वाढ झाल्याचे दिसून आले. अँटीबायोटिक्समुळे आतड्यातील मायक्रोबायोम म्हणजे जीवाणूंच्या वस्तीस्थानांवर विपरित परिणाम होतो, असेही दिसून आले. ज्या उंदरांना अँमॉक्सिलीन, टायलोसिन ही अँटीबायोटिक्स देण्यात आली, त्यांच्यात अनिष्ट परिणाम झाले. मुलांना ज्या प्रमाणात अँटीबायोटिक्स दिली जातात, त्याच प्रमाणत ती उंदरांना देण्यात आली. उंदराच्या दुसर्‍या गटाला मात्र ती दिली नाहीत. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ह्युमन मायक्रोबायोम प्रोग्रामचे संचालक मार्टिन ब्लेझर यांनी सांगितले की, मुलांवर बालपणी अँटीबायोटिक्सचे होणारे परिणामही यातून दिसून आले. अँटीबायोटिक्सचा वापर बेसुमार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. बालपणी अँटीबायोटिक्सचे जास्त सेवन केल्यास आतड्यांतील विषाणू नष्ट होतात व शरीरातील चयापचयाची क्रिया कायमची बिघडते. परिणामी लठ्ठपणा वाढू लागतो. टायलोसिनमुळे वजन वाढते तर अँमॉक्सिलिनमुळे हाडांची वाढ जास्त होते. शिवाय अँटीबायोटिक्समुळे आतड्यातील मायक्रोबायोमलाही धक्का बसतो. ते किती प्रमाणात व किती वेळा दिली जातात यावर त्यांचे दुष्परिणाम अवलंबून असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi