Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टॉमॅटो खा

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टॉमॅटो खा
लाल-लाल टॉमॅटो सर्वाना खाण्यासाठी आवडतात. आंबट-गोड अशी यांची चव असून त्यात अनेक पौष्टिक गुण असतात. युरोपमध्ये 1,379 व्यक्तींवर केलेल्या अध्ययनातून असे समजते की, जेवणात टॉमॅटाचे जास्त सेवन करतात अशा व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याची शक्तता कमी असते.
 
या अध्ययनात सहभागी होणार्‍या लोकांमध्ये सर्वात जास्त हे प्रौढावस्थामधील असून, त्यातील 662 लोकांना हृदयविकारचा झटका आला होता. या सर्वाच्या शरीरातील लायकोपीन (टॉमॅटोमध्ये आढळून येणारा पदार्थ)चे आकलन केले आहे. लायकोपीन हे प्रभावशाली ऑक्सिकरण रुपात असल्यामुळे फ्री रेडिकल्स अत्याधिक प्रतिक्रियात्मक रेणू, जे रक्त प्रवाहमधील अन्य पदार्थानादेखील हानी पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे अनेक आजार होऊ शकतात. तसेच हृदयविकार आणि कॉलेस्ट्रालपासून वाचण्यासाठी जास्त टॉमॅटो खा! आणि स्वस्थ राहा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करणे, हा मोठा धोका?