Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपताना स्मार्टफोन ठेवा दूर...

झोपताना स्मार्टफोन ठेवा दूर...
वर्तमानामध्ये स्मार्टफोनशिवाय श्वास घेणं कठिण झाले आहे असे वाटायला लागले आहे. फोन सतत हातात नसला की चुकल्या चुकल्यासारखे वाटतं. अनेक लोक बिछान्यावर गेल्यानंतर तासोतास चॅट करत राहत किंवा सर्च करतात. पण झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात हे स्मार्ट लोकांच्या लक्षात येत नाहीये. 
 
झोपताना स्मार्टफोन वापरल्याने चयापचय क्रियेवर परिणाम होतो, यामुळे वजन वाढतं. सतत वापर केल्याने मेंदू थकतो, डोळ्यांवर ताण येतो. अती वापरमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. झोपताना अर्थात अंधारत जास्त वेळ स्मार्टफोन चालवण्याने डोळे लाल आणि कमकुवत होण्याची शक्यता अधिक असते.
 
तरी तुम्हाला फोन जवळ ठेवून झोपण्याची सवय असेल तर डाटा प्लान बंद करून झोपावे. कारण सतत नोटिफिकेशन आणि व्हायब्रेशनमुळे तुमच्या झोपेत अडथळा येऊ शकतो. याने झोप पूर्ण होत नसून दुसर्‍या दिवशी थकवा जाणवतो. रात्री झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने मन एकाग्र राहत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi